Heart Problems : ‘या’ कारणांमुळे महिलांना असतो पुरुषांपेक्षा हृदयविकाराचा त्रास जास्त, वेळीच लक्ष द्या; नाहीतर…

Heart Problems : अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या संबंधित आजार वाढत चालले आहेत. विशेष म्हणजे महिलांना पुरुषांपेक्षा हृदयविकाराचा त्रास जास्त असतो. अनेकदा या आजारात रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात.

स्त्रियांमध्ये का वाढतात हृदयाच्या समस्या?

डॉक्टरांच्या मतानुसार, ‘महिलांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या प्रकरणांचे एक प्रमुख कारण म्हणजे जास्त जबाबदारीचे ओझे. जे तणाव वाढवण्याचे काम करते. कौटुंबिक आणि ऑफिसमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करत असताना महिला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वाढत्या वयानुसार निरोगी राहण्यासाठी, आपल्या आहाराकडे लक्ष देणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. अनेक आजार वेळेत उपचारांनी बरे होऊ शकतात.

जाणून घ्या हृदयविकाराची लक्षणे

स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात, जसे की श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, पाठ किंवा जबडा दुखणे. ज्याकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. अनेक वेळा हृदयविकार वेळेत सापडत नाहीत.

करा हे उपाय

तणावापासून राहा दूर

महिलांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. तणाव आणि नैराश्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमित योग, ध्यान आणि पुरेशी झोप यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. हृदयविकार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करावी. तुमचा रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर तपासत राहावी तसेच डॉक्टरांच्या सूचनेनुसार औषधे घेणे गरजेचे आहे.

आहार

महिलांनी सर्वात अगोदर आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांसह हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. तसेच सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट, सोडियम आणि साखरेचे पदार्थ यांचे सेवन कमी करून खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. तसेच हृदयविकार देखील टाळता येतात.

व्यायाम करावा

दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. सायकलिंग, चालणे, जॉगिंग, कार्डिओ हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. व्यायाम केले तर वजन नियंत्रणात राहते. यामुळे हृदयाच्या समस्यांबरोबरच मधुमेहाचा धोका कमी होतो.

धूम्रपान

धूम्रपान आणि मद्यपानावर नियंत्रण ठेवावे. धूम्रपानाची सवय सोडून दिली तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. मद्यपान मर्यादित प्रमाणात करा, जास्त मद्यपान केले तर रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोका वाढत जातो.

Leave a Comment