Healthy Hearth Test treatment  : या ५ टेस्ट नियमित करा हाटॅअॅटॅकपासून रहाल दूर

Healthy Hearth Test treatment  :  गेल्या काही महिन्यांपासून लोकांना हार्टसंबंधित व्याधींचा त्रास अधिक प्रमाणात सुरू झाला आहे. अगदी तरूण वयातील अनेकांना हार्टअॅटकचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हृदयविकाराने जीव गमावलेल्या लोकांमध्ये तिशीच्या आतील युवकांची संख्या मोठी आहे. ज्यांचा हार्टरेट ८० ते १२० या दरम्यान असणे ही चांगल्या हृदयाचे लक्षण आहे. पण यामध्ये जर काही बदल झाला तर त्यांनी हार्ट संबंधी काही चाचण्या तातडीने करून घेण्याची गरज आहे.

अगदी चालताफिरता हार्ट अॅटॅक येण्याच्या घटना वाढल्याने समाजात हृदयविकाराबाबत जागृती केली जात आहे. पण अजूनही अनेक लोक मला काय होतय याच अविर्भावात तब्येतीकडे दुर्लक्ष करतात जे अत्यंत चुकीचे आहे. डान्स करताना, व्यायाम करताना अचानक हृदयविकारचा झटका येणाऱ्यांच्या बातम्यांनी हार्ट अॅटक येण्यापूर्वीच्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहण्याची सूचना दिली आहे. मनोरंजन क्षेत्रातील काही प्रसिध्द कलाकारही या हृदयविकाराच्या जाळ्यात अडकले आहे. श्रेयस तळपदे, अतुल परचुरे हे कलाकार हृदयविकारामुळे साक्षात मृत्यूच्या दारातून परतले. अचानक हृदयविकाराचा झटका येण्याच्या वाढत्या घटनांनी सध्या प्रत्येकालाच आरोग्याची चिंता वाटत आहे. आरोग्यविषयक पाहणीनुसार रोज ५० हजार लोक हृदयविकाराने जीव गमावत आहेत. अशा परिस्थितीत, तुमच्या हृदयाचे आरोग्य किती चांगले आहे याची माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे बनले आहे. त्यासाठी अशा पाच चाचण्या आहेत त्या जर तुम्ही नियमित केल्या तर तुमच्या हृदयाची काळजी घेणे सोपे होईल.

कोणत्या आहेत या चाचण्या?

heart care tips ३० वयानंतर नियमितपणे ब्लडप्रेशर तपासत राहिले पाहिजे. त्यासाठी बीपी तपासण्याचे छोटे यंत्र घरी आणून ठेवा. किमान ८० तर कमाल १२० इतके बीपी असेल याची काळजी घ्या. दुसरी टेस्ट आहे ती कोलेस्ट्रॉल लेव्हलची. चांगल्या हृदयासाठी कोलेस्ट्रॉल लेव्हल (cholesterol test) २०० एमजी पेक्षा कमी असली पाहिजे. वेळोवेळी हे कोलेस्ट्रॉल त्याची धोका पातळी ओलांडत नाही ना हे तपासले पाहिजे. ज्यामुळे हार्टअॅटॅक येण्यापासून तुम्ही दूर राहू शकता. हार्टरेट योग्य आहे की नाही याकडेही सातत्याने लक्ष दिले तर तुमचे हृदय ठणठणीत राहिल. रक्तातील साखर योग्य प्रमाणात असेल तरीही हृदयविकार तुमच्या आसपास फिरकत नाही. त्यामुळे ब्लडशुगर १०० एमजीपेक्षा जास्त नसेल याची सतत खात्री करून घेत जा. वाढते वजन किंवा रक्तातील घट्टपणा वाढला तरी हृदयविकाचा झटका येण्याची चिन्हे असतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते बॉडी मास इंडेक्स (BMI) १८ ते २४ टक्के असला पाहिजे. या व्यतिरिक्त रोज एक तास व्यायाम, चालणे या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला दम लागत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर हृदयाच्या आवश्यक टेस्ट करण्यासाठी वेळ घालवू नका.

 

Leave a Comment