Health tips : ‘या’ पदार्थामुळे नियंत्रित होईल कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहासारखे गंभीर आजार, आजच करा आहारात समावेश

Health tips : जर तुम्ही दररोज तुमच्या आहारात एका सुपरफूडचा समावेश केला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. या पदार्थामुळे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहासारखे गंभीर आजार नियंत्रित होतील. जाणून घ्या.

नाचणी हे सुपरफूड असून ते आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. तुम्ही नाचणीचा आहारात समावेश केला तर कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि हृदयविकारावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. नाचणी खाल्ली तर मधुमेह आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवता येईल.

जाणून घ्या नाचणी खाण्याचे फायदे

नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने जे पचन व्यवस्थित ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात. उच्च फायबरमुळे तुमचे पोट भरले आहे, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

पोषक तत्वांनी समृद्ध

नाचणी कॅल्शियमचा एक चांगला स्रोत असून तो हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच यात लोहाचे प्रमाण देखील पुरेसे आहे, जे हिमोग्लोबिन पातळी राखण्यास मदत करते आणि अशक्तपणा दूर राहतो. विशेष म्हणजे शाकाहारी लोकांसाठी नाचणी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे.

मधुमेह राहतो नियंत्रित

कमी ग्लायसेमिक इंडेक्स: नाचणीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असून जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे.

अँटिऑक्सिडेंट गुणधर्म

फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण- नाचणीमध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. इतकेच नाही तर यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात.

हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी

नाचणीचे सेवन केले तर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

Leave a Comment