Health Tips: वाढत्या लठ्ठपणामुळे (obesity) शरीर केवळ कुरूप आणि लठ्ठ होत नाही, तर ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी बनते. जास्त वजनामुळे प्रजनन (Breeding) आणि श्वासोच्छवासाच्या (Breathing) कार्यापासून ते स्मृती आणि मूडपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होतो. लठ्ठपणामुळे मधुमेह (Diabetes), हृदयविकार (heart disease) आणि काही कर्करोगांसह (Cancer) अनेक घातक आजारांचा धोका वाढू शकतो. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवले नाही, तर त्यामुळेही तणाव निर्माण होतो. वाढत्या लठ्ठपणामुळे अनेक जुनाट आजारांचा धोका वाढू शकतो. वजन नियंत्रणात ठेवल्यास लठ्ठपणाचा धोका टाळता येतो. लठ्ठ लोकांसाठी, त्यांचे वजन ५-१० किलो कमी करणे देखील त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लठ्ठ लोक आदर्श वजन गाठू शकत नसले तरी ते लठ्ठपणामुळे होणारा धोका टाळू शकतात. चला जाणून घेऊया लठ्ठपणामुळे कोणत्या आजारांचा धोका वाढतो.
शरीराचे वजन अनेक हृदयरोगांच्या घटकांशी जोडलेले आहे. जसजसा बीएमआय वाढतो तसतसा रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर आणि जळजळ वाढते. हे बदल कोरोनरी हृदयरोग (coronary heart disease), स्ट्रोक (stroke) आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात.
मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका वाढण्याची शक्यता
जे लोक लठ्ठ आहेत त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा (High blood pressure) धोका जास्त असतो. तज्ञांच्या मते, टाइप 2 मधुमेह असलेल्या ८० टक्के रुग्णांना त्यांच्या इतिहासात लठ्ठपणा असतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा जवळचा संबंध आहे. तुम्हाला मधुमेह असल्यास, तुमचा रक्तदाबही उच्च राहण्याची शक्यता जास्त असते. यासाठी नियमित व्यायाम, योगासन, पायी चालणे, तासनतास एकाच जागेवर बसून न राहणे अश्या गोष्टी केल्या तर लठ्ठपणा अधिक बळावण्याची समस्या दूर होते.
- Must Read:
- Health news: सावधान; तासंतास मोबाईल पाहणाऱ्यांना जडतोय ‘हा’ घातक आजार
- Health Tips: आपल्या हृदयाचे ठोके अचानक का वाढतात? पहा कारणे, लक्षण, उपाय सविस्तर
- Health Tips: म्हणून सकाळी उठल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळाव्यातच; वाचा महत्वाची कारणे
- Health Tips: दोन चिमूट हळद घशाचा त्रास करेल दूर; फक्त ‘या’ पद्धतीने करा उपयोग
मूत्रपिंडाची समस्या बळावू शकते
लठ्ठपणा जास्त असल्यास किडनीच्या कार्यावरही परिणाम होतो. किडनीला (Kidney) अतिरिक्त काम करावे लागते. जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या रक्त शुद्ध करू शकत नाहीत, तेव्हा मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढू शकतो.
लठ्ठपणामुळे दम्याचा धोका वाढू शकतो
लठ्ठपणामुळे दम्याचा (Asthma) धोकाही वाढू शकतो. अमेरिकन लंग असोसिएशनच्या अहवालानुसार, छाती आणि पोटाभोवती अतिरिक्त चरबी आणि वजनामुळे फुफ्फुस संकुचित होतात आणि अशा स्थितीत व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. अतिरिक्त चरबी फुफ्फुसांना चालना देते आणि दमा होऊ शकतो.