Health tips : आजार राहतील कायमचे दूर, आहारात करा फक्त ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Health tips : हल्ली आजाराचे प्रमाण खुप वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर याचे प्रमाण खूप असते. यातील अनेक आजार असे आहेत ज्यामुळं जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. पण तुम्ही आजार काहीप्रमाणात दूर ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला आहारात सुपरफूड्सचा समावेश करावा लागेल.

गाजर

गाजर उत्कृष्ट अँटी-फंगल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-बॅक्टेरियल एजंट असून ते आपले पचन सुधारते. तसेच गाजर हे व्हिटॅमिन ए नी समृद्ध आहे. शिवाय गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे.

मशरूम

उकडलेले मशरूम हे नैसर्गिक प्रतिजैविक असून यात अँटी-हिस्टामाइन आणि अँटी-सेरोटोनिन असते. तसेच यात तांबे आणि सेलेनियम सोबत डी आणि बी जीवनसत्त्वे आहेत.

मध

हे अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण सुपरफूड असल्याने आपण प्रत्येकाने त्याचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. मध हा एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे, त्यामुळे मधुमेही ते मर्यादित प्रमाणात घेऊ शकतात.

पालक

आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट आणि व्हिटॅमिन ए भरपूर असणाऱ्या पालकाचे सेवन केले तर आपला ॲनिमियापासून बचाव होतो आणि मुलांचा योग्य विकास होण्यास मदत होते.

रताळे

रताळे हे व्हिटॅमिन ए, सी, बी6, थायामिन, रिबोफ्लेविन, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मँगनीज रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवत असते. तसेच ते पचनक्रिया देखील मजबूत करतात.

पेरू

पेरूमध्ये संत्र्यापेक्षा 5 पट जास्त व्हिटॅमिन सी असते आणि वजन कमी करण्यासाठी, बद्धकोष्ठता, हृदय, रक्तातील साखरेची पातळी आणि मासिक पाळीच्या दरम्यान पेरू खाणे खूप फायदेशीर आहे.

अंडी

अंड्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, प्रथिने असतात. हे सर्व पोषक घटक सर्वांसाठी उर्जेचे केंद्र आहेत.

ड्राय फ्रूट्स

प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, फायबर, निरोगी चरबी आणि भरपूर जीवनसत्त्वे असणारे ड्राय फ्रूट्स हे झटपट ऊर्जेचा चांगला स्रोत आहे.

संत्री

संत्री हे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी असण्यासोबतच यात हेस्पेरिडिन नावाचे एक संयुग आढळते, ज्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.

Leave a Comment