Health Tips: How to Control Blood Sugar Level: जगभरात डायबिटीज (Diabetes) रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारताला ‘डायबेटिस कॅपिटल’ (Diabetes Capital) असेही म्हटले जाते. कारण येथे अनेक लोक या आजाराला बळी पडत आहेत. यामागे अनुवांशिक कारणांसोबतच खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील समस्याही आहेत. या वैद्यकीय स्थितीत अशा रुग्णांनी स्वत:ची काळजी न घेतल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Leve) वाढेलच मात्र, किडनी (Kidney) आणि हृदयविकारासह (heart disease) इतर अनेक आजारांचा धोकाही निर्माण होऊ शकतो. तथापि, आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये बदल करुन, आपण ही समस्या बर्याच अंशी कमी करता येऊ शकते. त्यासाठी तुम्ही दुपारी आणि रात्री जेवण केल्यानंतर एक छोटे काम केले तर तुमचे काम अधिक सोपे होईल.
डायबिटीजपासून तुमचे आरोग्य बिघडण्यापासून कसे रोखाल?
आहारातून या गोष्टींना वगळा
आपल्या खाण्यापिण्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी अजिबात चांगल्या नाहीत. तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारातून तांदूळ (Rice) आणि बटाटे (Potatoes) कमी करावे लागतील. कारण त्यामधील कॅलरीज रक्तातील ग्लुकोजची (blood glucose) पातळी वाढवतात आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
नेहमीच्या आहारात या पदार्थांना द्या प्राधान्य
Diabetes च्या रुग्णांनी सकस आहार घ्यावा. विशेषतः हिरव्या भाज्या त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहेत. जसे की, फ्लॉवर (Flower), कोबी (Cabbage), बीन्स (Beans) इत्यादी याशिवाय चिकन, मासे याप्रमाणे प्रथिनेयुक्त आहारही (Protein diet) आवश्यक आहे. अन्न कमी तेलात शिजवावे अन्यथा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढेल याची काळजी घ्या.
- Must Read:
- Ayurveda Health Tips: पचनशक्ती होऊ लागेल कमजोर ,रात्रीच्या जेवणात ठेवा ” या ” 5 पदार्थांपासून अंतर
- Agriculture News: लम्पी त्वचारोगाचा धोका कधी संपणार; पशुपालकांना लागली आहे चिंता
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Rain Alert : पावसाचा मुक्काम कायम.. आज ‘या’ भागात होणार जोरदार पाऊस; जाणून घ्या..
दुपारी आणि रात्री जेवण केल्यानंतर करा एक छोटे काम
दुपारी आणि रात्री जेवण केल्यानंतर एक छोटे काम करावे लागेल. दुपारी आणि रात्री तुम्ही हेल्दी आहार घेतला तरी त्यानंतर ५ ते १० मिनिटे चालणे आवश्यक आहे, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे तुमच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.
तणावापासून राहा दूर
मधुमेहाचा रुग्ण असो किंवा कोणतीही सामान्य व्यक्ती, प्रत्येकाने तणावापासून दूर राहावे, कारण ते अनेक रोगांचे मूळ आहे. जीवनात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कारण काळजी ही चिंता करणे, हे मधुमेहाला निमंत्रण देण्यासारखे आहे.