Health tips : शरीरात असतील ‘या’ समस्या, तर बदाम मिसळून प्या दुध; लगेचच दिसेल परिणाम

Health tips : चांगले आरोग्य ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे, जी टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे. जीवनशैलीत छोटे-छोटे बदल केले तर आपण तसे करण्यास सक्षम ठरतो. या बदलांमध्ये खाण्या-पिण्याच्या सवयी जोडलेल्या आहेत.

आपल्या शरीरासाठी बदाम अतिशय फायदेशीर आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण बदाम सेवन करतात. आपल्या शरीरात जर काही समस्या असतील तर तुम्ही बदाम मिसळून दुधाचे सेवन करू शकता.

बदाम आणि दूध प्यायले तर शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते, असे झाले तर कमकुवत हाडे मजबूत होतात. इतकेच नाही तर याच्या मदतीने तुम्ही अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. बदामाच्या दुधाचे सेवन केले तर कोणते फायदे होतात? जाणून घेऊया.

बदाम आणि दुधाचे पोषक

दूध ही गुणांची खाण मानली जात असून त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात सापडतात. तर त्याच वेळी, बदामामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक असतात. इतकेच नाही तर यात व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते.

जाणून घेऊयात फायदे

ऊर्जा

बदाम आणि दूध प्यायले तर तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. थकवा आणि अशक्तपणा जाणवत असताना बदाम आणि दूध पिणे फायदेशीर ठरते. नाश्त्यात बदामाचे दूध प्यायले तुम्हाला ऊर्जावान राहण्यास मदत होते.

निरोगी त्वचा

बदाम आणि दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर असून बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात सापडते, जे त्वचेसाठी चांगले असते.

प्रतिकारशक्ती वाढते

शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वांचीही गरज असते, हे लक्षात घ्या. यासोबतच बदाम आणि दुधातही भरपूर प्रथिने आढळतात.

हाडे होतात मजबूत

महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता खूप सामान्य असून अशा परिस्थितीत बदाम आणि दुधाचे सेवन केले तर सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

असे करा दुधाचे सेवन

  • एका ग्लास गरम दुधात ४-५ बदाम बारीक करून रात्री झोपण्यापूर्वी प्यावे, फायदा होईल.
  • हे लक्षात घ्या की रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही बदामाचे दूध कधीही पिऊ शकता.
  • 3-4 बदाम रात्रभर भिजत ठेवून त्याची साल काढून दुधात बारीक करून सकाळी नाश्त्यानंतर प्या.

Leave a Comment