Health tips : चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहार खूप महत्त्वाचा आहे. मध हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण बाजारात सर्रास अशुद्ध मध विकला जात आहे. त्यामुळे मध विकत घेताना तो काळजीपूर्वक खरेदी करा.
थंडीच्या दिवसात मध गोठण्यास सुरवात होते, परंतु ते खराब होत नाही. अनेकदा मध घट्ट होतो आणि त्यात स्फटिकांसारखे छोटे कण दिसतात. त्यावेळी अनेकांना असे वाटते की मध खराब झाला आहे. पण तसे होत नाही. मध कधीच खराब होत नाही. मधामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज सारख्या नैसर्गिक शर्करा असल्याने त्यात ते क्रिस्टलसारखे तयार झाल्याचे पाहायला मिळते.
कधीकधी मधामध्ये क्रिस्टल्सची उपस्थिती शुद्धतेशी निगडित असून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) नुसार, मध चिकट, द्रव आणि स्फटिकासारखे असणे सामान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो मध खराब आहे.
जाणून घ्या मधाचे फायदे
आयुर्वेदानुसार मध हे अमृत मानले जाते, कारण त्यात सर्व आवश्यक पोषक घटक आढळतात. मधामध्ये व्हिटॅमिन बी, सी, पोटॅशियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम इत्यादी गुणधर्म आढळतात. त्यामुळे जे लोक रोज मधाचे सेवन करत असतात. त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात राहते.
इतकेच नाही तर हंगामी आजारांचा धोकाही कमी होतो. यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये त्वचा चमकदार राहते. रोज सकाळी रिकाम्या पोटी मधाचे सेवन केले तर ऊर्जा मिळते तसेच शरीरातील अशक्तपणा दूर होतो. त्याचबरोबर ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांनी दररोज मधाचे सेवन करणे गरजेचे आहे.