Health Tips : शरीराच्या या कमतरतेकडे करू नका दुर्लक्ष, पडेल तुम्हाला खूप महागात

Health Tips : हे लक्षात घ्या की सततच्या समस्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता दर्शवतात, त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असू शकते.कोणती आहेत ही पोषक तत्व जाणून घ्या.

ज्यावेळी शरीरात काही आवश्यक पौष्टिकतेची कमतरता असते, त्यावेळी आपले शरीर अनेक सिग्नल देते, जे ओळखणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. नाहीतर आपल्या समस्या वाढू शकतात. पोषणतज्ज्ञांच्या मतानुसार काही अन्नपदार्थ या पोषक तत्वांची कमतरता भरून काढू शकतात.

सतत शरीर दुखणे

सतत शरीर दुखणे हे पोटॅशियमच्या कमतरतेचे लक्षण आहे.

पोटॅशियमचे स्रोत – केळी, रताळे, एवोकॅडो, नारळ पाणी, पालक आणि बीटरूट

कोरडी त्वचा

कोरडी त्वचा हे शरीरात झिंकच्या कमतरतेचे लक्षण आहे.

पोटॅशियमचे स्रोत- ओट्स, भोपळ्याच्या बिया, चणे, काजू इ.पोटॅशियमचे स्रोत आहेत.

पोटावर चरबी जमा होणे

पोटावर चरबी जमा होणे हे जास्त इस्ट्रोजेन दर्शवते

हे कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात क्रूसिफेरस भाज्यांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, ज्यात फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश होतो. गाजर खाणे फायदेशीर आहे.

हात पायांना मुंग्या येणे

हात पायांना मुंग्या येणे हे शरीरात व्हिटॅमिन बी -12 च्या कमतरतेचे संकेत

व्हिटॅमिन बी-12 चे स्त्रोत – अंडी, पालक, चीज, दूध इ. व्हिटॅमिन बी-12 चे स्त्रोत आहेत.

सतत काहीतरी थंड खाण्याची इच्छा

सतत काहीतरी थंड खाण्याची इच्छा होणे हे लोहाच्या कमतरतेचे लक्षण आहे

स्रोत- हिरव्या पालेभाज्या, काळे मनुके, कोरडे मनुके, कडधान्ये इ.

Leave a Comment