Health Tips : जर तुमच्या लघवीचा रंग बदलला असेल तर वेळीच सावध व्हा. याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. लगेचच तुमच्या डॉक्टरांना याबाबत माहिती द्या. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
मूत्राच्या रंगावरून ओळखा आरोग्य
रंगहीन किंवा पारदर्शक लघवी: असे झाले तर तुम्ही खूप पाणी पीत असाल. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची गरज असते.
गुलाबी किंवा लाल लघवी – कधीकधी बीटरूट, ब्लूबेरी खाल्ली तर लघवी गुलाबी किंवा लाल होते. पण हे लक्षात घ्या की जर तुम्ही असे काही खाल्ले नसेल तर ते चिंतेचे कारण असते. गुलाबी किंवा लाल लघवी हे किडनी किंवा युरिन कॅन्सर, किडनी स्टोन, युरिन इन्फेक्शन, प्रोस्टेट प्रॉब्लेमची लक्षणं असतात.
गडद किंवा मध रंगाचे मूत्र – गडद रंगाचे मूत्र हे सौम्य निर्जलीकरणाचे लक्षण असून ज्यावेळी या प्रकारची लघवी होते त्यावेळी हे समजून घ्या की तुम्हाला जास्त पाण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही दिवसभर घाम गाळत असाल किंवा काही वेळापूर्वी व्यायाम पूर्ण केला असल्यास तेव्हा असे होऊ शकते.
तपकिरी लघवी – गडद तपकिरी लघवी तुमच्या लघवीत पित्त असेल तर असे होऊ शकते, जे यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकते. तपकिरी मूत्र हे पोर्फेरियाचे लक्षण असून त्वचा आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणारा विकार असतो.
केशरी रंग – समजा तुमची लघवी केशरी रंगाचा दिसत असल्यास तर तुम्ही पुरेसे पाणी पीत नसाल. यकृत किंवा पित्त नलिकाची समस्या असेल तर अशा रंगाचे लघवी होऊ शकते. किंवा हे अन्न किंवा औषधांमुळे होते. हायड्रेटेड राहूनही केशरी रंग नाहीसा होत नसेल तर लगेचच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
हलका तपकिरी किंवा गडद पिवळा – हलक्या पिवळ्या श्रेणीत येणारे मूत्र हे असे सूचित करते की तुम्ही निरोगी आणि हायड्रेटेड आहात. पिवळा रंग तुमच्या शरीरात तयार होणाऱ्या युरोक्रोम नावाच्या रंगद्रव्यामुळे होतो.
डॉक्टरांचा घ्या सल्ला
लघवीचा रंग रक्तरंजित दिसल्यास लघवी करताना वेदना होत असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे, हे लक्षात घ्या. कारण काहीवेळा, मूत्रमार्गात बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे लघवीचा रंग निळा, गडद किंवा केशरी झाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.