Health symptoms । आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. काही लक्षणांवरून तुम्हाला तुमच्या आतड्याचे आरोग्य समजेल.
पचनामध्ये समस्या
समजा तुम्हाला पचनामध्ये समस्या येत असेल किंवा तुम्हाला अनेकदा गॅस, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होत असल्यास हे समजून घ्या की तुमची आतडे निरोगी नाहीत.
अंगदुखी
जर तुम्हाला तुमच्या गुडघे आणि स्नायूंमध्ये वेदना होत असल्यास हे देखील दर्शवते की तुमची आतडे निरोगी नाहीत. अनेकवेळा, खराब आतड्यांमुळे शरीरातील वेदना लक्षणीय वाढते.
वजन कमी-जास्त होणे
समजा तुमचे देखील वजन झपाट्याने वाढत असेल किंवा कमी होत असेल तर ते खराब आतड्याचे लक्षण आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा आतडे व्यवस्थित काम करत नसतात तेव्हा शरीर पोषक द्रव्ये योग्य प्रकारे शोषू शकत नाही, ज्यामुळे चरबी जमा होते.
तणाव आणि मूड बदलणे
तणाव आणि मूड स्विंग यांचा थेट आतड्यांशी संबंध असून ज्यावेळी तुमची आतडे निरोगी नसतात तेव्हा तुमचा मेंदू देखील योग्यरित्या कार्य करत नाही. ज्यामुळे तुम्हाला नैराश्य येण्याची शक्यता असते.
थकवा आणि निद्रानाश
तुमची आतडे निरोगी नसतील तर तुम्हाला झोप येऊ शकणार नाही. याचे कारण असे की आतड्यांमधून सेरोटोनिन संप्रेरक तयार होत असल्याने जे तुम्हाला झोपायला मदत करते.