Health news : आरोग्य विभागाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान, क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेची तयारी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. या मोहिमेत या आजारांबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. तसेच क्षय (TB) व कुष्ठरोगाचे (Leprosy) रुग्णही शोधण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील 40 लाख 99 हजार लोकसंख्येचे आणि 8 लाख 15 हजार 682 कुटुंबांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या (Health) 2866 पथकांद्वारे करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कुष्ठरोगासह क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत संशयित रुग्ण आढळल्यास या रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुढील तपासणी करून त्यानुसार औषधोपचार करण्यात येणार आहेत. या अभियानाचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार केली आहेत. या पथकांद्वारे जिल्ह्यात नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
देशात 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय आहे. या अभियानात क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. या आधीही क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत आढळलेल्या क्षयरुग्णांना पुढील औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. क्षयरुग्णांना पूरक आहार आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागांकडून या रुग्णांना अनुदान देण्यात येते. तसेच खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची माहिती कळविण्याच्या सूचना जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांना दिल्या आहेत.
कॅन्सर, मधुमेहाचे प्रमाण वाढले
देशात असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त आहे. रक्तदाब, मधुमेह (Diabetes), कॅन्सर (Cancer), श्वसनदाह या आजारांचा असंसर्गजन्य रोगात समावेश आहे. आजच्या बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार देणे तसेच या आजारांबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. हे आजार कशाने होतात, आजार टाळण्यासाठी काय करावे, याबाबत नागरिकांना योग्य माहिती मिळाल्यास या आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.