Health news: पुणे (Pune): सध्या गणेशोत्सव (ganesh festival)सुरू आहे. दररोज बाप्पांची आरती करताना पुजेमध्ये बाप्पाच्या डोक्यावर दुर्वाची (durva grass) जुडी वाहिली जाते. गणपतीसाठी लागणारी व त्यानंतर केवळ गवत म्हणून आपण ज्या दुर्वांकडे पाहतो ती एक औषधी गुणधर्म (Ayurveda plants) असलेली महत्त्वपूर्ण अशी वनस्पती आहे. निसर्गात अगदी कुठेही सहज उपलब्ध होणाऱ्या या दुर्वांचा आपल्या स्वास्थ्यरक्षणासाठी वापर केला तर बाप्पांचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने आपल्याला लाभेल.  (Ganesh Festival 2022 / Pune Ganeshotsav)

‘दूर्वा’ही आरोग्यवर्धक व अनेक रोगांवर रामबाण असल्याचे सिद्ध झाले आहे. दुर्वांचे हिंदी नाव दुब तर संस्कृत नावे अमृता, अनंता, गौरी व दूर्वा आहेत. मराठीत दूर्वा, हरळी म्हणतात. दुर्वा शीत असल्यामुळे  उलटी, विसर्प, तहान लागणे, पित्तशामक, आमातिसार, रक्तपित्त (कान व नाकातून रक्त येणे ) तसेच जखम भरून काढण्यास मदत करते. नाकातून उष्णतेने रक्त (blood) पडत असल्यास दूर्वांचा दोन थेंब रस नाकात टाकल्यास रक्त येणे बंद होते. उचकी, मुलांना जंत, गर्भवती स्त्रियांना ओकाऱ्या येने, चक्कर येत असल्यास, विंचू दंश झाल्यास, ताप

(feverआल्यावर तसेच तापाची तीव्रता वाढल्यास ती कमी करण्यासाठी, रक्ती मूळव्याध, अतिसार, आमांश, आमातिसार, रक्तार्श, शरीरात पित्ताचा जोर वाढला असल्यास, पोटातील विकार, त्वचेचे विकार, बोटामध्ये होणाऱ्या चिखल्या, शिरशूल, रक्तप्रदर, रक्तस्त्राव, गर्भपात, योनी विकार, मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना, अनियमित मासिक चक्र, रक्तस्त्राव कमी किंवा अधिक होणे, मुत्रशर्करा (kidney stone)यामध्ये दुर्वांचा वापर लाभकारी आहेत. मधुमेही रुग्ण, त्वचाविकार रुग्ण, अंगात दाह असेल तर सकाळी व सायंकाळी दूर्वांवरून किंवा हरळीवरून ५ ते १० मिनिटे चालावे, अंगातील दाह कमी होतो. लॅपटॉप, संगणकावर काम केल्यामुळे डोळ्यावर ताण येऊन डोळे (on screen working eye problem on laptop / computer) दुखतात. दुर्वांचा कुटून डोळ्यांच्या पापण्यांवर लेप लावल्यास डोळे दुखणे, तसेच डोळ्यातून पाणी येणे कमी होते. मुरुमांचे काळे डाग नाहिसे करण्यासाठीही दुर्वांचा वापर होतो.

Share.

Leave A Reply

Exit mobile version