नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी कोविड-19 च्या परिस्थितीबाबत 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि चंदीगडचे आरोग्य मंत्री उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले, की लोक मोठ्या प्रमाणात होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारत आहेत. म्हणून, राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांचे निरीक्षण केले पाहिजे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड चाचणी आणि कोरोना लसीकरण डेटा वेळेवर पाठवण्यास सांगितले. ज्या राज्यांमध्ये चाचण्या कमी होत आहेत, तेथे ती अधिक तीव्र करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, याआधी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे आरोग्य मंत्री आणि प्रधान सचिवांबरोबर चर्चा केली.
अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मनसुख मांडविया यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा कमी आहे. जरी दररोज 3 लाखांहून अधिक संसर्गाची नवीन प्रकरणे नोंदली जात आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 2.55 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचा प्रभाव पाहता देशात कोरोना लसीकरण मोहिमेवर भर दिला जात असून दररोज लाखो लोकांचे लसीकरण केले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना लसीकरणाची संख्या आता 162.92 कोटींच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सोमवारी 62 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली.
दिलासादायक बातमी : आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; पहा, काय आहे देशातील परिस्थती..