Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य टिप्स : मुलांच्या वाढीसाठी चांगला आहार आवश्यक.. करा या तीन गोष्टींचा समावेश

अहमदनगर : आरोग्य तज्ञ निदर्शनास आणतात की, बालपनातील पोषण हे तारुण्य आणि वृद्धापकाळाचे आरोग्य ठरवते. त्यामुळेच मुलांना अशा प्रकारचा आहार देण्यावर भर दिला जातो जेणेकरून त्यांच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व सहज मिळू शकतील.

Advertisement

प्रथिने, कॅल्शियम, निरोगी स्निग्धांश, लोह, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारख्या पोषक घटकांची विकासादरम्यान मुलांना गरज असते. हे सर्व पोषक घटक शारीरिक आणि मानसिक विकासासोबत शरीराची लांबी वाढवण्यास मदत करतात.

Advertisement

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या विकासादरम्यान पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळेच त्यांना अधिकाधिक धान्य, फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि प्रथिनेयुक्त पदार्थ दिले पाहिजेत. जाणून घेऊ या अशा पदार्थांविषयी, जे प्रत्येक वाढणार्‍या मुलाला द्यायलाच हवे.

Loading...
Advertisement

मुलांना बदाम खायला द्या : दररोज सकाळी मूठभर बदाम मुलांची स्मरणशक्ती, दृष्टी आणि अगदी मानसिक विकासासाठी मदत करू शकतात. बदामामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि हेल्दी फॅट्स आढळतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. भिजवलेल्या बदामाचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. अभ्यासानुसार, बदाम हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई हे महत्त्वाचे पोषक घटक मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

Advertisement

अंडी : चरबी आणि प्रथिनांचा समृद्ध स्रोत असलेले अंडे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. एका मोठ्या अंड्यामध्ये सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात. यामध्ये असलेले अमीनो अॅसिड हाडांच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात आणि त्यांना मजबूत करतात. याशिवाय अंड्यातून व्हिटॅमिन डी देखील मिळू शकतो, हे पोषक तत्व हाडांना कॅल्शियम योग्य प्रकारे शोषण्यास मदत करते.

Advertisement

दुग्ध पदार्थ : प्रथिनाव्यतिरिक्त, हाडांची चांगली रचना आणि मजबुतीसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. दही, चीज, दूध आणि लोणी यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. दुधात हेल्दी फॅट्स, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मिळते ज्यामुळे बाळाची उंची वाढण्यास मदत होते. एका ग्लास दुधात आठ ग्रॅम पर्यंत प्रथिने असतात, जे स्नायू तयार करण्यासाठी देखील उपयुक्त असतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply