Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मुलांना लैंगिक नॉलेज देताना अशी घ्या काळजी; पहा नेमक्या यासाठी कोणत्या आहेत ट्रिक्स

भारतीय समाजात लैंगिकता हा मुद्दाच दुर्लक्षित आहे. या विषयावर बोलणे किंवा प्रश्न विचाराने म्हणजे महापाप अशीच बहुसंख्य भारतीयांची धारणा असते. त्यातही आपल्या शिक्षणात यावर अजिबात फोकस नसल्याने अगदी 30-35 वयाच्या मंडळींच्यातही सेक्स आणि शारीरिक प्रेम या भावानेबाबत अनेक गैरसमज दिसतात. युरोप-अमेरिकेप्रमाणे मुलांनाच शैक्षणिक कालावधीत लैंगिक शिक्षण देण्याचा मुद्दाही अनेकांना सामाजिक मुद्दा न वाटता राजकीय वाटत असल्याने आपल्याकडे यावर गैरसमज जास्त दिसतात.

Advertisement

लैंगिक शिक्षण हे सर्वांसाठी आवश्यक आणि महत्वाचे आहे यात काहीच शंका नाही. विशेषतः मुले आणि तरुणांना त्यांच्या वयानुसार योग्य वेळी लैंगिक शिक्षण दिले पाहिजे. हे खूपच आवश्यक आहे. कारण एका विशिष्ट वयातच मुलांना त्यांच्या शरीरातील बदलांसह त्यांच्या आजूबाजूस घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशा प्रकारे मुलांना योग्य वेळी योग्य माहिती दिली पाहिजे. नाहीतर गैरसमज हेच ज्ञान बनून त्यावरच त्यांची गृहीतके पक्की होतात. ज्याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकेल. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ही भिन्न आहे. विशिष्ट वयात लैंगिक संबंध आणि लैंगिकतेबद्दल काय शिकले पाहिजे याबद्दल आपण माहिती घेऊया.

Advertisement

टॉडलर्स (वय 13 ते 24 महिने) मुले व मुलींना जननेंद्रियासह शरीराच्या सर्व भागाची नावे आणि त्याचे कार्य, उपयोग माहिती असावेत. शरीराच्या अवयवांची नावे व इतर माहिती शिकवून आरोग्याच्या समस्या, गुप्तरोग किंवा लैंगिक अत्याचाराबाबतचे मुद्दे अशा कालावधीत स्पष्ट भाषेत सांगावेत. तर, वय वर्षे 2 ते 5 या कालावधीत मुलांचा समजूतदारपणा आणि स्वारस्याच्या पातळीवर आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांच्या जन्मकथेविषयी माहिती सांगू शकता. एकाचवेळी सर्वकाही कव्हर करण्याची घाई करू नका.

Advertisement

लहान मुले ही लैंगिक संबंधापेक्षा गर्भवती महिलेच्या पोटात वाढणारे बाळ आणि बाळांच्या जन्मामध्ये अधिक रस घेतात. या व्यतिरिक्त त्यांना हे देखील समजले पाहिजे की, त्यांच्या शरीराला परवानगीशिवाय कोणीही त्यांच्या स्पर्श करू शकत नाही. चांगला-वाईट स्पर्श याबाबतही त्यांना समजेल अशा पद्धतीने माहिती द्या. तसेच या वयातच मुलांनी एखाद्याला स्पर्श करण्यापूर्वी त्यांची परवानगी घेण्यास शिकले पाहिजे. तसेच त्याच्या मर्यादांबद्दल शिकणेही सुरू केले पाहिजे. मात्र, जास्त अपेक्षा ठेऊन त्यांना तणावामध्ये ठेऊ नका.

Loading...
Advertisement

5 ते 8 वर्षे वयाच्या कालावधीत त्यांना मूलभूत ज्ञान दिले पाहिजे. जसे की लिंग एखाद्या व्यक्तीच्या जननेंद्रियाद्वारे निर्धारित केले जात नाही आणि काही लोक भिन्नलिंगी, समलैंगिक किंवा उभयलिंगी असतात. मात्र, ही माहिती देताना त्यांना विश्वासात घेऊन योग्य माहिती द्या. नातेसंबंधांमधील गुप्तता, नग्नता आणि इतरांचा आदर या मूलभूत सामाजिक परंपरांबद्दलही मुली-मुलांना याच जागरूक केले पाहिजे. तसेच त्यांना यौवन सुरू होण्याबद्दल मूलभूत शिक्षणदेखील दिले पाहिजे.

Advertisement

पौगंडावस्थेतील (वय 9 ते 12 वर्षे) मुली-मुलांना किशोरवयात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षित लैंगिक संबंध आणि गर्भनिरोधकाबद्दल शिकवले पाहिजे. त्यांना गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमणाबद्दलही मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांना हे माहित असावे की, किशोरवयीन असल्याचा अर्थ असा नाही की त्यांना लैंगिक क्रियाशील असावे असेच नाही. कशामुळे चांगले संबंध बनतात आणि काय वाईट आहे, हे त्यांना समजले पाहिजे. त्यांना इंटरनेट सिक्युरिटीच्या माहितीसह पोर्न, यौन उत्पीडन आणि लैंगिक ज्ञानाबद्दल देखील माहित असले पाहिजे.

Advertisement

पौगंडावस्थेतील (वय 13 ते 18 वर्षे) मुली-मुलांना पिरीयड, नाईट फॉल (स्वप्नातील वीर्यपतन) आणि स्लीप ऑर्गेज्मबद्दल सविस्तर माहिती दिली पाहिजे. त्यांना गर्भधारणा, लैंगिक संबंधातून पसरणारे आजार, वेगवेगले गर्भनिरोधक पर्याय आणि सुरक्षित लैंगिक वापरासाठी ते कसे वापरावे याबद्दल देखील माहित असली पाहिजे. त्यांना निरोगी संबंध आणि अनहेल्दी रिलेशनशिपमधील फरक सतत समजून घ्यावा लागतो आणि शिकत राहणे आवश्यक आहे. यात प्रेशर आणि लैंगिक हिंसाचाराबद्दल जाणून घेणे, परस्पर संमतीने लैंगिक संबंध करण्याचा अर्थ काय आहे हे समजून सांगणेदेखील यात समाविष्ट आहे. महत्वाचे म्हणजे लग्न आणि कुटुंब संस्थेचे फायदे आणि त्यामध्येच लैंगिक भावना पूर्ण करण्याची का आवश्यकता आहे हेही स्पष्ट भाषेत समजावून सांगावे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply