अहमदनगर : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. या काळात आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा जास्त महत्वाचे ठरते. आरोग्याच्या दृष्टीने काय फायदेशीर ठरेल याचा विचार करुन आपल्या दैनंदीन आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा मिळेल. हिवाळ्यात आरोग्य उत्तम राहणे तसेच मेंदूची कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या ठरतात. आहाराच्या वेळा पाळल्या तरी त्याचा फायदा मिळेल. तसेच या काळात काही खाद्य पदार्थांचा आहारात समावेश केला तर त्याचाही फायदा मिळेल.
हिवाळ्याच्या दिवसात सुका मेव्याचे वेगळेच महत्व आहे. काजूमध्ये कॅलरीज जास्त असतात. हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्त कॅलरीज आवश्यक असतात. काजू कॅलरीज पुरवतो, ज्यामुळे शरीर निरोगी राहते.
बदाम मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत करतो. थंडीच्या वेळी बदाम खाल्ल्याने प्रोटीन, कॅल्शियम मिळते. बदामाची खीर बनवूनही घेऊ शकता.
अक्रोड शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन असते. जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. अंजीरामध्ये लोह असते, जे शरीरातील रक्त वाढण्यास मदत करते. खजूरा0मध्ये लोहासह खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. थंडीच्या दिवसात खजूर दररोज 20 ते 25 ग्रॅम घेतले पाहिजे.
दूध आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. हिवाळ्याच्या दिवसात सर्दी आणि खोकल्याचा त्रास अनेकांना होता. अशा वेळी हळद आणि दूध घेणे फायदेशीर ठरते.
डिंकाचे लाडू हिवाळ्याच्या दिवसात आरोग्यास फायदेशीर ठरतात. एका लाडूमध्ये 300 ते 350 कॅलरीज असतात. तसेच मिक्स डाळीचे लाडू मसूरमध्ये प्रोटीन असते. हे केस गळतीची समस्या कमी करते आणि शरीरास ऊर्जा प्रदान करते.
हिवाळ्यात हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात असतात. हिरव्या भाज्या पुरेशा प्रमाणात पोषण तसेच शरीराला आंतरिक शक्ती देतात.
मध हे एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे, त्यात असलेले औषधी गुणधर्म तुम्हाला सर्दी आरोग्याच्या समस्यांपासून दूर ठेवतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतात.
आरोग्य मंत्र : प्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन-डी आवश्यक मात्र जास्त सेवन केल्यास होतात गंभीर दुष्परिणाम