Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : देशात सलग चौथ्या दिवशी सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण; वाचा, महत्वाची माहिती..

मुंबई – देशात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे 2000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. मृतांची संख्या अडीच पटीने वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,226 रुग्ण (New Corona Patient) आढळले आहेत. या दरम्यान 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जो कालच्या तुलनेत अडीच पट अधिक आहे. काल 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, गेल्या 24 तासांत 2202 जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या 14 हजार 955 वर पोहोचली आहे. साथरोगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5,24,413 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत गेल्या 24 तासांत 2 हजार 323 प्रकरणे आढळून आली असून 25 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 479 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 19,03,189 वर पोहोचली आहे, तर विषाणूमुळे मृतांची संख्या 26,200 वर पोहोचली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 198 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आता एकूण संक्रमितांची संख्या 1,062,674 झाली आहे. शहरात आतापर्यंत 16,566 लोकांचा या साथीमुळे मृत्यू झाला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच आहे. यामध्ये आशियाई देश उत्तर कोरियाला (North Korea) सर्वाधिक फटका बसला आहे. उत्तर कोरियामध्ये 20 दिवसांत 20 लाख लोकांना ताप आला आहे. रुग्णालये तुडुंब भरल्याची परिस्थिती आहे. लोकांवर घरीच उपचार केले जात आहेत. हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी तातडीची बैठक आयोजित केली आहे. अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, कोरोनाला रोखण्यात अपयश आल्यास उत्तर कोरियावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. देशातील ढासळत चाललेली आरोग्य व्यवस्था आणि लसीकरणाकडे (Vaccination) होणारे दुर्लक्ष यामुळे दोन कोटींहून अधिक लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

कोरोनाचा वाढला ताप.. रुग्णालये भरली; कठोर लॉकडाऊन; जाणून घ्या, कोरोनाचे जागतिक अपडेट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply