Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचा वाढला ताप.. रुग्णालये भरली; कठोर लॉकडाऊन; जाणून घ्या, कोरोनाचे जागतिक अपडेट..

दिल्ली – जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच आहे. यामध्ये आशियाई देश उत्तर कोरियाला (North Korea) सर्वाधिक फटका बसला आहे. उत्तर कोरियामध्ये 20 दिवसांत 20 लाख लोकांना ताप आला आहे. रुग्णालये तुडुंब भरल्याची परिस्थिती आहे. लोकांवर घरीच उपचार केले जात आहेत. हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी तातडीची बैठक आयोजित केली आहे. अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, कोरोनाला रोखण्यात अपयश आल्यास उत्तर कोरियावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. देशातील ढासळत चाललेली आरोग्य व्यवस्था आणि लसीकरणाकडे (Vaccination) होणारे दुर्लक्ष यामुळे दोन कोटींहून अधिक लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 2,323 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर या कालावधीत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह रुग्णांबद्दल सांगितले तर त्यांची संख्या 14 हजार 996 वर पोहोचली आहे.

Advertisement

चीनची (China) आर्थिक राजधानी शांघायमध्ये 5 दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. यानंतर स्थानिक प्रशासनाने आणखी दोन जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध जाहीर केले आहेत. तसेच 1 जूनपासून शहराने दीर्घकाळ चालणारे लॉकडाऊन संपवण्याची कोणतीही योजना नाकारली आहे. अडीच कोटी लोकसंख्या असलेले हे शहर 7 आठवड्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोनाने अमेरिकेत (America) सर्वाधिक थैमान घातले असून कोविड-19 मुळे आतापर्यंत 10.28 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेत कोरोनाची संख्या निश्चितच कमी झाली असली तरी, तरीही दररोज सरासरी 360 लोकांचा मृत्यू होत आहे.

Loading...
Advertisement

भारतात, ओमिक्रॉन (Omicron) उप-प्रकार BA.4 चे पहिले प्रकरण हैदराबादमध्ये आढळले आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सूत्रांनी सांगितले की कोरोनाचा हा स्ट्रेन BA.2 सारखाच आहे. देशात आतापर्यंत 5.24 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियामध्येही (South Korea) कोरोनाने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. गेल्या 24 तासांत येथे 23 हजार 442 नवीन रुग्ण आढळले असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण मृतांची संख्या 23,911 वर पोहोचली आहे.

Advertisement

कोरोनाचे मीटर डाऊन..! मागील 24 तासांत देशभरात सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण..

Advertisement
Advertisement

Leave a Reply