Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

China Politics: आणि म्हणून जीनिपिंग भडकले; ‘त्यांना’ दिलाय गंभीर इशारा

Please wait..

दिल्ली : भारताच्या (India) कुरापतखोर शेजारी चीनमध्ये (China) पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तिथे लॉकडाऊन (lockdown) करण्यासह भारतात ज्या पद्धतीने पोलीस आणि शासकीय यंत्रणांनी नागरिकांवर अत्याचार सुरू केले होते. तसेच किंबहुना यापेक्षा जास्त कडक नियम आणि अत्याचार करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चीनचे असे व्हिडिओ जगभरात व्हायरल होत आहेत. अशावेळी कोविड-19 ची वाढती प्रकरणे आणि कडक लॉकडाऊन दरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Chinese president xi jinping) यांनी देशाच्या शून्य-कोविड धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

Advertisement
Loading...

सीएनएन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ही बैठक झाली. यामध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च पॉलिटब्युरो स्थायी समितीने ‘डायनॅमिक झिरो-कोविड’ (zero covid policy) या सामान्य धोरणाचे ठामपणे पालन करण्याचा आणि देशाच्या साथीच्या प्रतिबंधक धोरणांना नकार देणाऱ्या कोणत्याही शब्द आणि कृतींविरुद्ध दृढनिश्चयाने लढण्याचा निर्धार केला. कोविडविरुद्धच्या चीनच्या लढाईवर जिनपिंग यांनी अशी सार्वजनिक टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. “आमची प्रतिबंध आणि नियंत्रणाची रणनीती पक्षाचे स्वरूप आणि ध्येयानुसार ठरवली जाते. आमची धोरणे इतिहासाच्या कसोटीवर टिकू शकतात, आमचे उपाय वैज्ञानिक आणि प्रभावी आहेत,” स्थानिक माध्यमांनी सात सदस्यीय समितीच्या हवाल्याने हे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement

वुहानच्या (vuhan and china corona covid-19 news update) रक्षणाची लढाई आम्ही जिंकली असून शांघायच्या रक्षणाची लढाई आम्ही नक्कीच जिंकू शकू, असे समितीने म्हटले आहे. स्थायी समितीने कार्यकर्त्यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आखून दिलेल्या धोरणांची सखोल, संपूर्ण आणि सर्वसमावेशक माहिती घेण्यास सांगितले. गेल्या अनेक आठवड्यांत, शांघायमधील रहिवाशांनी अन्नाची तीव्र टंचाई आणि वैद्यकीय सेवेचा अभाव असताना मदतीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply