Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोना अपडेट : देशात पुन्हा वाढले कोरोनाचे रुग्ण; मागील 24 तासात ‘इतके’ सापडलेत कोरोनाबाधित..

दिल्ली – देशात एकाच दिवसात कोविड-19 (Covid 19) च्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी 2,568 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर आज म्हणजेच बुधवारी सकाळी 8 वाजता जाहीर झालेल्या आकडेवारीत हा आकडा तीन हजारांच्या पुढे गेल्याचे सांगण्यात आले. गेल्या 24 तासांत देशात 3,205 नवीन रुग्ण आढळले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 19,509 वर पोहोचली आहे. या दरम्यान 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 19,509 वर पोहोचली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.05 टक्के आहे. रुग्णांचा राष्ट्रीय रिकव्हरी दर (Recovery Rate) 98.74 टक्के आहे.

Advertisement

अद्ययावत आकडेवारीनुसार, संसर्गाचा दैनिक दर 0.91 टक्के आहे आणि साप्ताहिक दर 0.76 टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण 4,25,44,689 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. त्याच वेळी, देशव्यापी लसीकरण (Vaccination) मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 189.84 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

Loading...
Advertisement

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. 26 एप्रिलपासून दररोज 3 हजारांहून अधिक प्रकरणे सापडत होती. जे 29 एप्रिलला सर्वाधिक पातळीवर होते. तेव्हापासून प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 26 एप्रिलनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एकूण प्रकरणांची संख्या 3 हजारांच्या खाली गेली आहे. 26 एप्रिल रोजी 2927 प्रकरणे नोंदली गेली. त्यानंतर 27 एप्रिलला 3303, 28 एप्रिलला 3377, 29 एप्रिलला 3688, 30 एप्रिलला 3324 आणि 1 मे रोजी 3157. काल कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या 3 हजारांच्या आत होती. आज मात्र पुन्हा नव्या कोरोना रुग्णांनी 3 हजारांचा टप्पा पार केला आहे.

Advertisement

Corona Update : देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली.. मागील 24 तासात सापडलेत ‘इतके’ रुग्ण

Advertisement
Advertisement

Leave a Reply