Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली.. मागील 24 तासात सापडलेत ‘इतके’ रुग्ण

दिल्ली : गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 2568 नवीन रुग्ण आढळले आहेत. हे आदल्या दिवसाच्या तुलनेत 18.7 टक्के कमी आहेत. 5 दिवसांनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा 3 हजारांपेक्षा कमी नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. आता देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 19 हजारांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 19,137 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एका दिवसाआधीच्या तुलनेत त्यात 363 ने घट झाली आहे. एकूण संसर्गाच्या 0.04 टक्के अॅक्टिव्ह प्रकरणे झाली आहेत.

Advertisement

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत कोविडमुळे देशात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 15 मृत्यू हे आधी केरळमध्ये झाले होते, परंतु आता डेटा अपडेट केला गेला आहे. देशात आतापर्यंत 5,23,889 कोरोनामुळे मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 98.74 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 2911 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 4,25,41,887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Advertisement

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. 26 एप्रिलपासून दररोज 3 हजारांहून अधिक प्रकरणे सापडत होती. जे 29 एप्रिलला सर्वाधिक पातळीवर होते. तेव्हापासून प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 26 एप्रिलनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एकूण प्रकरणांची संख्या 3 हजारांच्या खाली गेली आहे. 26 एप्रिल रोजी 2927 प्रकरणे नोंदली गेली. त्यानंतर 27 एप्रिलला 3303, 28 एप्रिलला 3377, 29 एप्रिलला 3688, 30 एप्रिलला 3324 आणि 1 मे रोजी 3157.

Loading...
Advertisement

राज्यांमधील प्रकरणांची स्थिती पाहिल्यास, गेल्या 24 तासांत दिल्लीत सर्वाधिक 1076 प्रकरणे नोंदण्यात आली आहेत. दिल्लीनंतर, हरियाणामध्ये 439, केरळमध्ये 250, उत्तर प्रदेशमध्ये 193 आणि कर्नाटकमध्ये 111 रुग्ण आढळले आहेत. देशातील 80 टक्क्यांहून अधिक प्रकरणे या 5 राज्यांमध्ये आढळून आली आहेत. एकट्या दिल्लीत 41.9 टक्के प्रकरणे नोंदली गेली आहेत.

Advertisement

Corona Update : कोरोना पु्न्हा वेगवान.. मागील 24 तासांत सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण

Advertisement

कोरोना अपडेट : ‘या’ सहा राज्यांमुळे वाढले मोदी सरकारचे टेन्शन.. पहा, किती सापडताहेत नवे रुग्ण

Advertisement
Advertisement

Leave a Reply