Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : देशात मागील 24 तासात सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण; पहा, काय आहे परिस्थिती..

दिल्ली : देशात कोविड-19 संसर्गाची ( Covide 19) प्रकरणे पुन्हा एकदा वाढली आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणू संसर्गाचे 3,688 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 2,755 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दरम्यान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रुग्णांची संख्या 4,30,72,176 झाली आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत 5,23,803 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर देशभरात 4,25,333,77 रुग्ण बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. आता हा आकडा 18,684 वर पोहोचला आहे.

Advertisement

शुक्रवारी देशात कोरोना विषाणूचे 3377 नवे रुग्ण (Corona Patient) आढळून आले, म्हणजेच कालच्या तुलनेत आज 311 अधिक रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत 883 ची वाढ झाली आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या 60 मृत्यूंच्या तुलनेत शनिवारी मृतांची संख्या 50 झाली आहे. देशातील एकूण संक्रमित रुग्णांच्या तुलनेत अॅक्टिव्ह प्रकरणांचा दर आता 0.04 टक्के आहे, तर रिकव्हरी दर (Recovery Rate) 98.8 टक्के आहे. देशात कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.22 टक्के आहे. देशात पॉजिटिविटी दर (Positivity Rate) 0.74 टक्के झाला आहे. त्याच वेळी, साप्ताहिक पॉजिटिविटी दर 0.66 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत 4,96,640 नमुने तपासण्यात आले आहेत.

Loading...
Advertisement

देशाची राजधानी दिल्लीत कोविड-19 संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदली जात आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाचे 1,607 नवीन रुग्ण आढळले आहेत, 1246 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे आणि 2 मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3259 वर पोहोचली आहे. राज्यातील दैनिक कोविड-19 पॉजिटिव दर 5.28% आहे. शुक्रवारी दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाची 1490 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. राष्ट्रीय राजधानीत अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता 5609 वर पोहोचली आहे. त्यापैकी 139 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, तर 3863 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

Advertisement

Corona Update : कोरोना पु्न्हा वेगवान.. मागील 24 तासांत सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण

Advertisement
Advertisement

Leave a Reply