Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोना अपडेट : ‘या’ सहा राज्यांमुळे वाढले मोदी सरकारचे टेन्शन.. पहा, किती सापडताहेत नवे रुग्ण

दिल्ली- कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत आहे. देशात दोन आठवड्यांपासून दररोज दोन हजारांहून अधिक नवीन प्रकरणांची नोंद होत आहे. बुधवारी तीन हजार नवे बाधित (Corona Patient) आढळले. जर आपण आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह किमान सहा राज्यांमध्ये संसर्ग वाढला आहे.

Advertisement

बुधवारी दिल्लीत (Delhi) 1,367 रुग्ण आढळले, जे एकूण प्रकरणांपैकी 40 टक्क्यांहून अधिक आहे. 5 दिवसांपासून येथे दररोज हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. हरियाणा हे दुसरे सर्वाधिक प्रभावित राज्य ठरले आहे. बुधवारी येथे 500 हून अधिक रुग्ण आढळून आले. त्याच वेळी, उत्तर प्रदेशमध्ये तपासणी वाढल्याने, बाधितांची संख्या 200 च्या पुढे गेली आहे.

Advertisement

उत्तराखंडही काळजीत वाढ आहे. अवघ्या एका आठवड्यात येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्याच वेळी, मुंबईत पुन्हा एकदा 100 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर, याआधी देशात 20 पेक्षा जास्त राज्यांमध्ये रुग्ण आढळत नव्हते, मंगळवारी ही संख्या आठ झाली. हे पाहून राज्ये कठोर निर्बंध टाकण्याचा विचार करत आहेत.

Loading...
Advertisement

उत्तराखंड राज्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याची तयारी, तपासण्यांची संख्याही वाढणार आहे. दिल्लीमध्ये व्यापाऱ्यांनीच बाजारात कोरोनाचे नियम लागू करायला सुरुवात केली, तपासण्यांमध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यात मास्क (Mask) वापरणे बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे, राज्यात विविध ठिकाणी जनजागृती केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष पथके तैनात करत आहे. केरळमध्ये सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच राज्याच्या बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे.

Advertisement

Corona Update : कोरोनाचा वेग पुन्हा वाढला.. मागील 24 तासात सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण..

Advertisement
Advertisement

Leave a Reply