Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीत कोरोनाचा धोका पुन्हा वाढला.. सरकारने दिलेत ‘हे’ महत्वाचे आदेश; वाचा महत्वाची माहिती..

दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण (Corona Patient) वाढत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व रुग्णालयांना सतर्क (Alert) राहण्यास सांगितले आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, की ‘दिल्ली सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे आणि सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. आम्ही आमच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पूर्णपणे सुधारणा केली आहे. याबरोबरच दिल्लीतील कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमध्ये सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Advertisement

ते म्हणाले, की “कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्ली सरकार (Delhi Govt) कोरोना संक्रमित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करत आहे. त्याचवेळी गरज पडल्यास आरटी-पीसीआर चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जाईल. चाचणी, ट्रेसिंग आणि उपचार या तत्त्वावर सरकार काम करत आहे. विविध लसींचे सावधगिरीचे डोस लवकरच दिल्ली सरकारकडून सरकारी रुग्णालयांमध्ये लोकांना मोफत दिले जातील. सत्येंद्र जैन यांनीही लोकांना लवकरात लवकर लसीकरण (Vaccination) करून घेण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले, की “उपचारापेक्षा प्रतिबंध करणे चांगले आहे. ज्यांनी अद्याप लसीकरण केलेले नाही किंवा ज्यांनी फक्त पहिला डोस घेतला आहे त्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांच्या पूर्ण लसीकरण करुन घ्यावे.

Loading...
Advertisement

विशेष म्हणजे, शुक्रवारी दिल्लीत कोविड-19 चे 366 नवीन रुग्ण आढळले, तर संसर्ग दर 3.95 टक्क्यांवर पोहोचला. शहराच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीत कोविड प्रकरणे आणि संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. विभागाच्या माहितीनुसार, शहरातील कोविडचे एकूण 685 रुग्ण त्यांच्या घरी विलगीकरणात आहेत. दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये (Hospital) कोविड रुग्णांसाठी 9,735 खाटा आहेत आणि त्यापैकी 51 (0.52 टक्के) अजूनही भरल्या आहेत.

Advertisement

कोरोनाबाबत ‘WHO’ ने दिलाय नवा इशारा; सांगितलेय कोरोनाचे गणित; वाचा, महत्वाची माहिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply