Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. कोरोनानंतर ‘तिथे’ आलाय नवा आजार.. पहा कोणत्या आजाराने उडालीय खळबळ..

दिल्ली : देशात कोरोना (Corona) आटोक्यात येत असतानाच काही ठिकाणी आणखी एका आजारामुळे खळबळ उडाली आहे. हा आजार मात्र प्राण्यांतील आहे. बिहार राज्यातील सुपौल जिल्ह्यात बर्ड फ्लूने (Bird Flue) थैमान घातले आहे. सदर ब्लॉकच्या छपकाही गावातील काही वॉर्डांमध्ये पक्ष्यांसाठी घेतलेल्या नमुन्यांवरून या आजाराची खात्री झाली आहे. यानंतर जिल्हास्तरावर रिस्पॉन्स टीम (Response Team) तयार करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. गेल्या दोन आठवड्यांआधी छापकही गावातील वॉर्ड 1 ते 11 मध्ये काही कोंबड्या आणि बदकांचा अचानक मृत्यू झाला होता. आजूबाजूला अनेक कावळेही मृतावस्थेत आढळून आले.

Advertisement

यानंतर पाटणा (Patana) येथील पथकाने काही संक्रमित पक्ष्यांचे नमुने घेतले. यामध्ये बर्ड फ्लूची खात्री झाली. यानंतर जिल्हास्तरावर तयार करण्यात आलेल्या रीपड रिस्पॉन्स टीमने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. याबरोबरच 1 ते 9 किलोमीटर परिसरात येणाऱ्या सर्व गावांमध्येही त्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले, की छपकाही गाव हे केंद्र मानून एक किलोमीटर परिघातील सर्व गावांसाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच सर्व पक्षीपालकांना नुकसान भरपाई दिली जाईल.

Loading...
Advertisement

देशात याआधीही काही ठिकाणी बर्ड फ्लूची प्रकरणे आढळली होती. आता पुन्हा या आजाराची प्रकरणे आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आह. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. देशात आता कुठे कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असतानाच या दुसऱ्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे.

Advertisement

बाब्बो.. डोकेदुखीत आणखीनच वाढ झाली की..; चीनमध्येच सापडला ‘H10N3’ बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply