Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : मागील 24 तासात देशात सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण; पहा, काय आहे परिस्थिती

दिल्ली : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1,007 नवे रुग्ण (New Corona Patient) आढळले आहेत. कालच्या तुलनेत कोरोना प्रकरणांमध्ये 7.4 टक्क्यांनी घट झाली आहे. एका दिवसाआधी देशात कोरोनाचे 1,088 रुग्ण आढळले होते. याबरोबरच देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांमध्येही लक्षणीय घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण 11,058 वर आले आहेत. सध्या, देशातील अॅक्टिव्ह प्रकरणे आता एकूण प्रकरणांपैकी फक्त 0.03 टक्के बाकी राहिली आहेत.

Advertisement

गेल्या 24 तासांत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 818 नोंदवण्यात आली असून, त्यानंतर देशातील एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,25,06,228 झाली आहे. देशातील रिकव्हरी दर (Recovery Rate) 98.76 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्याच वेळी, दैनिक पॉजिटिविटी दर (Positivity Rate) 0.23 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच, साप्ताहिक पॉजिटिविटी दर 0.25% वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 4,34,877 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासह आतापर्यंत देशात 83.08 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्याचवेळी, देशभरात लसीकरण (Vaccination) मोहिमेअंतर्गत देशात 186.22 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Advertisement

दरम्यान, जगातील काही देशात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. यामध्ये युरोप आणि आशियातील काही देशांचा समावेश आहे. सध्या चीनमध्ये (China) कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. अगदी कठोर उपाययोजना करुन कोरोना आटोक्यात आणल्याचा दावा करणाऱ्या चीनला कोरोनाने हैराण केले आहे. काही दिवसांपासून येथे कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. एरव्ही दोन किंवा तीन रुग्ण सापडले तरी कठोर लॉकडाऊन (Lockdown) करणाऱ्या या देशात आता 1 मार्चपासून अतिशय वेगाने कोरोना रुग्ण (Corona Patient) सापडले आहेत. सध्या देशातील परिस्थिती आधिक गंभीर आहे, असे येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Loading...
Advertisement

जगात कोरोना हा घातक व्हायरस (Corona Virus) दाखल होऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. 17 नोव्हेंबर 2019 रोजी चीनमध्ये (China) कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर, पुढील 222 दिवसांत म्हणजेच 25 जून 2020 पर्यंत जगभरातील कोरोना बाधितांची (Corona Patient) संख्या 1 कोटींवर पोहोचली होती. एक ते 10 कोटी रूग्ण होण्यासाठी फक्त 214 दिवस लागले. यानंतर, संसर्गाचा वेग इतका वाढला की केवळ 190 दिवसांत जगभरातील रुग्णांची संख्या 20 कोटीपर्यंत पोहोचली होती.

Advertisement

कोरोनाचा धसका..! ‘या’ राज्यातील शाळा पुन्हा ऑनलाइन; पहा, कोणत्या जिल्ह्यात घेतलाय ‘हा’ निर्णय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply