Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच आहे की..! प्रत्येक मतदार संघात होणार एक दवाखाना; पहा, कुणी केलीय ही मोठी घोषणा..

दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने आज राज्यातील नागरिकांच्या दृष्टीने एक महत्वाची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा मतदारसंघांमध्ये 100 खाटांची सर्व सुविधा असलेली अद्ययावत रुग्णालये तयार केली जातील. याबरोबरच राज्यातील प्रत्येक विकास गटात 25 ते 30 खाटांचे सर्वोत्कृष्ट आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

Advertisement

मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, संवेदनशील सरकार कसे कार्य करते, हे उत्तर प्रदेशातील प्रत्येकाने कोरोनाच्या काळात पाहिले आहे. कोरोना साथरोगाच्या काळात कोरोना वॉरियर्सच्या सेवाभावनेचे आणि टीमवर्कचे कौतुक करून ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत लसीचे 30 कोटी डोस उपलब्ध करून दिले आहेत. मोफत चाचणी, उपचार आणि लस याबरोबरच डबल इंजिनच्या सरकारने प्रत्येक गरजूंना दर महिन्याला रेशनही मोफत दिले आहे. ही सर्व कामे सातत्याने सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी लोकांना संसर्गजन्य रोग नियंत्रण मोहीम, टीबी मुक्ती अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Advertisement

मुख्यमंत्री म्हणाले की, आजपासून सुरू होणारा जन आरोग्य मेळावा राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर दर रविवारी आयोजित केला जाईल. मेळ्यात मोफत वैद्यकीय मार्गदर्शन, मोफत चाचण्या आणि मोफत औषधांच्या माध्यमातून लोकांना आरोग्याची भेट मिळणार आहे. आरोग्य मेळा 2020 मध्येच सुरू झाला होता परंतु कोरोना संसर्गामुळे तो पुढे ढकलावा लागला होता. तो पुन्हा एकदा सुरू होत आहे. राज्यातील सर्व लोकांना वैद्यकिय मार्गदर्शन मिळावे हा त्यामागचा उद्देश आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, राज्यात दुसऱ्यांदा सरकार आल्यानंतर काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मोफत रेशन योजनेस मुदतवाढ, शंभर दिवसात सरकारी विभागातील रिक्त जागा भरती करणे, रोजगार मेळावे आयोजित करणे असे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Advertisement

.. तर भाजप करणार आणखी एक जबरदस्त रेकॉर्ड; 40 वर्षात पहिल्यांदाच घडणार ‘हा’ चमत्कार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply