Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उन्हाचा तडाखा वाढला..! ‘या’ जिल्ह्यात तापमान गेले 45 पार; पहा, कधी होणार मान्सूनचे आगमन..

दिल्ली : सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. उत्तर भारतात तर उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे, की लोकांना घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झाले आहे. राजस्थानच्या अल्वरमध्ये शुक्रवारी कमाल तापमान 45 अंशांच्या वर गेले होते. अल्वरमध्ये शुक्रवार हा सर्वात उष्ण दिवस होता. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे.

Advertisement

एप्रिलच्या सुरुवातीलाच मे-जूनप्रमाणे अत्यंत प्रखर उष्णता जाणवत आहे. उत्तरेतील राज्ये सध्या कडक उन्हाच्या चटक्याने होरपळत आहेत. राजस्थानमधील अल्वरमध्ये आज कमाल 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. देशातील उर्वरित राज्यांमध्येही विक्रमी उन्हाळा दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणातील अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या वर नोंदवण्यात आले. राजधानी दिल्लीबद्दल सांगितले तर दिल्लीतही दिवसाचे कमाल तापमान 40 अंशांच्या वर नोंदले गेले. कडक सूर्यप्रकाश आणि उष्ण वारे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Loading...
Advertisement

मे-जूनमध्ये उन्हाळा शिगेला पोहोचल्याने आगामी काळात आणखी उष्मा अपेक्षित आहे. मात्र, जून महिन्याच्या अखेरीस मान्सून दाखल झाल्याने जुलै महिन्यापासून हवामान बदलू लागते आणि जुलैच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनचा पाऊस सुरू होतो. स्कायमेट वेदरनुसार 6 एप्रिलपर्यंत दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. असे घडल्यास 7 एप्रिलपर्यंत दक्षिण बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यावेळी मान्सून कमकुवत नसून तो सामान्य असेल.

Advertisement

Weather Update : देशातील ‘या’ राज्यात पडणार भीषण उन्हाळा.. पहा, काय आहे हवामानाचा अंदाज..

Advertisement
Advertisement

Leave a Reply