Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा..! ‘अशी’ घ्या, आपल्या त्वचेची काळजी.. ‘या’ आहेत काही सोप्या टिप्स..

पुणे : आता कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. काही ठिकाणी तर मार्च महिन्यातच मे महिन्यातील उन्हाळा जाणवू लागला आहे. या काळात आरोग्याची काळजी घेणे सुद्धा महत्वाचे आहे. या दिवसात त्वचेवर अतिरिक्त तेल असल्याने मुरुम आणि मुरुमांच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. तसेच घामामुळे खाज येणे, पुरळ उठणे इत्यादी समस्या होतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे महत्वाचे ठरते. याबाबत आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. त्यांच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेऊ शकता.

Advertisement

उन्हाळ्यात कोरडेपणाबरोबरच त्वचेवर काळपटपणा यांसारख्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसात बहुतेकांना घराबाहेर पडणे आवडत नाही. केवळ सूर्यच नाही तर हवामानात सध्या असलेल्या उष्णतेमुळे त्वचेवर टॅनिंग किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. खरं तर, ऋतूनुसार त्वचेची काळजी वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचेवर अतिरिक्त तेल असल्याने मुरुम आणि मुरुमांच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. तसेच घामामुळे खाज येणे, पुरळ उठणे इत्यादी समस्या होतात.

Advertisement

हिवाळ्यात असे फेस वॉश वापरले जातात, जे त्वचेला कोरडे होण्यापासून संरक्षित करतात. परंतु उन्हाळ्यातही ते चेहऱ्यावर लावावेच असे नाही. तज्ज्ञांच्या मते, फेसवॉशने नियमित चेहरा स्वच्छ करायला हवा. ज्यामुळे चिकटपणा आणि कचरा सहज निघून जाऊ शकतो. बहुतेक लोकांना या ऋतूमध्ये त्वचेवर चिकटपणा येण्याची समस्या असते आणि त्यामुळे मुरुम आणि इतर समस्या उद्भवतात.

Advertisement

उन्हाळा असो की हिवाळा, सनस्क्रीन लावून घराबाहेर पडणे उत्तम मानले जाते. तथापि, उन्हाळ्यात किमान तीनदा किंवा दोनदा चेहरा आणि हातावर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. बर्‍याच लोकांना असे वाटते की एकदा त्यांनी सनस्क्रीन लावले की ते त्यांच्या त्वचेचे संरक्षण करते. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून तीनदा सनस्क्रीन लावण्याआधी प्रत्येक वेळी चेहरा स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे.

Loading...
Advertisement

उन्हाळ्यात त्वचेवर कोरडेपणा, तेल आणि धूळ यांचा त्रास कायम राहतो. पण जर या गोष्टी व्यवस्थित काढल्या नाहीत तर त्या त्वचेला निर्जीव देखील करू शकतात. सकाळी उठल्यानंतर फेस वॉश करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे, परंतु दिवसातून एकदा चेहरा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement

उन्हाळ्यात पाळा ‘असे’ पथ्यपाणी.. रोजच्या आहारात घ्या, ‘ही’ महत्वाची काळजी; वाचा, महत्वाचे मुद्दे..

Advertisement

Skin Cancer Symptoms : तुमचे डोळेही देतात कर्करोगाचे संकेत.. कसे ते वाचा सविस्तर

Advertisement
Advertisement

Leave a Reply