Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात पाळा ‘असे’ पथ्यपाणी.. रोजच्या आहारात घ्या, ‘ही’ महत्वाची काळजी; वाचा, महत्वाचे मुद्दे..

पुणे : आपल्या शरीराला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी पाणी हे सर्वात महत्वाचे पोषक तत्वांपैकी एक आहे. हे शरीराच्या अनेक कार्यांचे नियमन करते आणि या कारणामुळे तज्ज्ञ वारंवार शरीराला हायड्रेट करण्यासाठी आवश्यक प्रमाणात पाणी पिण्याची शिफारस करतात. जेव्हा तापमान वाढू लागते तेव्हा आपल्या शरीरात अनेक बदल होतात, त्यातील एक म्हणजे पाण्याची कमतरता.

Advertisement

उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो त्यामुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यासाठी पाणी तर घेतोच मात्र, अशीही काही फळे आहेत जी उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण करू शकतात. तुम्ही टरबूज, टोमॅटो, काकडी, स्ट्रॉबेरी इत्यादी भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करू शकता. अनेक भाज्या आणि फळे आहेत ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.

Advertisement

काकडी
उन्हाळ्यात प्रत्येकाला काकडी खायला आवडते याचे एक कारण म्हणजे त्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. काकडीमध्ये जवळपास 95 टक्के पाणी असते. इतकेच नाही तर काकडीत पोटॅशियम भरपूर असते, जे उष्माघातापासून बचाव करते. याशिवाय काकडी मेंदूचे आरोग्य वाढ करते.

Advertisement

टरबूज
हे एक अतिशय चविष्ट फळ आहे, जे उन्हाळ्यात हमखास दिसते. टरबूजमध्ये 92 टक्के पाणी असते जे उष्माघाताचा सामना करण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी टरबूज खाण्याचे सांगितले जाते.

Advertisement

सफरचंद
‘रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता, असे तुम्ही कधी ना कधी ऐकले असेलच. सफरचंदात 86 टक्के पाणी असते आणि ते सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय हे फळ अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी देखील समृद्ध आहे. सफरचंद हृदयाचे आरोग्य सुधारते.

Loading...
Advertisement

टोमॅटो
टोमॅटोमध्ये 94 टक्के पाणी असते आणि ते भाज्या आणि अगदी ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे दृष्टी कमी होण्याचा आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. हे सर्व प्रकारच्या त्वचेच्या समस्या देखील सुधारू शकते.

Advertisement

स्ट्रॉबेरी
या फळाचे वजन त्यात असलेल्या पाण्यामुळे होते. स्ट्रॉबेरीमध्ये 91 टक्के पाणी असते. या स्वादिष्ट फळामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि मॅंगनीज असतात. ही सर्व पोषकतत्त्वे मधुमेह, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित अनेक आजारां विरोधात लढण्याचे काम करतात.

Advertisement

पालक
या पालेभाजीमध्ये 93 टक्के पाणी असते आणि त्यात लोह असते. हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते आणि रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत ठेवते. पालकामध्ये इतक्या जास्त प्रमाणात पाणी असते हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. पण फक्त पाणीच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्वाचे घटक पालकामध्ये असतात.

Advertisement

उन्हाळ्यात काळजी घ्या की..; वाचा आठ महत्वाचे आरोग्यदायी मुद्दे

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply