Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता येणार ‘आम आदमी’ चे E-Health Card; पहा, सामान्य लोकांसाठी सरकारने काय केलाय प्लान..?

दिल्ली : आरोग्य सेवा जागतिक दर्जाची बनवण्यासाठी केजरीवाल सरकार पुढील वर्षापर्यंत दिल्लीतील प्रत्येक रहिवाशांना ई-हेल्थ कार्ड (E Health Card) देणार आहे. दिल्लीच्या आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी आढावा बैठक घेतली. HIMS प्रणाली लागू होण्याच्या किमान 3 महिने आधी दिल्लीतील लोकांना ई-हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. मार्च 2023 पासून ही प्रणाली पूर्णपणे सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमचे उद्दिष्ट हेल्थ मॅनेजमेंट जागतिक दर्जाचे बनवणे हा आहे. अशी योजना देशात कधीच सुरू झालेली नाही. संपूर्ण देशात अशा प्रकारचे हे पहिले ई-हेल्थ कार्ड असतील, ज्यामध्ये रुग्णांची सर्व वैद्यकीय माहिती उपलब्ध असेल. आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम लागू झाल्यानंतर रुग्णालयातील रांगांपासून लोकांना मुक्तता मिळेल. लोक ऑनलाइन पोर्टलचा वापर करून घरबसल्या डॉक्टरांची भेट घेऊ शकतील, त्यानंतर ते ठरलेल्या वेळी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊ शकतील. त्यामुळे त्यांचा वेळही वाचेल आणि डॉक्टरांना भेटणे सोयीचे होईल.

Loading...
Advertisement

दिल्ली सरकारची योजना आहे की लोकांना हेल्थ कार्ड मिळवण्यासाठी हॉस्पिटल किंवा ऑफिसच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी सरकार संपूर्ण दिल्लीत सर्वेक्षण करणार आहे. जेणेकरून प्रत्येकाचे हेल्थ कार्ड बनवता येईल. याबरोबरच रुग्णालये आणि इतर नियुक्त ठिकाणीही हेल्थ कार्ड बनवण्यात येणार आहेत. घरोघरी पडताळणी करून हेल्थ कार्डचे वाटप केले जाईल. हेल्थ कार्डमध्ये व्यक्तीचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास असेल आणि कार्डच्या मदतीने तो एचआयएमएसशी संबंधित कोणत्याही रुग्णालयात उपचार घेऊ शकेल, हेल्थ कार्ड तयार झाल्यानंतर त्याला वैद्यकीय अहवाल देण्याची गरज भासणार नाही.

Advertisement

याबरोबरच दिल्लीतील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ही योजना लवकरात लवकर लागू करण्याचा दिल्ली सरकारचा प्रयत्न आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने खासगी रुग्णालयेही जोडली जातील. रुग्णालय प्रशासन, अंदाजपत्रक आणि नियोजन, पुरवठा साखळी व्यवस्थापन यांसारख्या सर्व रुग्ण सेवा या प्रणाली अंतर्गत आणल्या जातील. या प्रणालीद्वारे हेल्थ कार्ड जारी केले जातील आणि ते ऑनलाइन वापरासाठी उपलब्ध असतील. यामुळे दिल्लीतील लोकांना सर्व माहिती एकाच छताखाली मिळू शकेल आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल.

Advertisement

आरोग्य ओळखपत्र तयार केले की नाही..? डिजिटल हेल्थ कार्डचे आहेत जबरदस्त फायदे; जाणून घ्या, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply