देशाच्या पारंपारिक औषधांसाठी मोठा निर्णय..! WHO ‘तिथे’ सुरू करणार ‘Global Centre’; पहा, काय असेल खास..
दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने पारंपारिक औषधांसाठी जागतिक केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारबरोबर एक करार केला आहे. WHO चे पारंपारिक औषधांवरील जागतिक केंद्र गुजरात राज्यातील जामनगर येथे स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा आयुष विभाग आणि WHO यांच्यात 25 मार्च रोजी जिनिव्हा येथे करार करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात हा करार झाला आहे.
21 एप्रिल 2022 रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. भारत या केंद्रासाठी 25 कोटी डॉलर खर्च करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी WHO आणि भारत सरकार यांच्यातील या कराराचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, गुजरातमध्ये बनवले जाणारे WHO चे नवीन जागतिक केंद्र जगाला चांगले आणि किफायतशीर वैद्यकीय उपाय उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले, की हे नवीन जागतिक केंद्र आधुनिक संशोधन आणि पारंपारिक औषधे आणि वैद्यकीय पद्धतींचे मानकीकरण करण्यात मदत करेल. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयसस म्हणाले की, जगातील कोट्यावधी लोकांसाठी पारंपारिक औषध ही रोगांवर उपचारांची पहिली पायरी आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक औषधांना शास्त्रीय आधार देऊन अधिक प्रभावी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या केंद्राच्या स्थापनेबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की जगातील 80 टक्के लोकसंख्या पारंपारिक औषधे वापरतात. तसेच, UN च्या 194 पैकी 170 देशांनी त्यांच्याद्वारे वापरल्या जाणार्या पारंपारिक औषधे आणि वैद्यकीय प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी WHO ची मदत मागितली होती. आधुनिक औषधांमध्ये वापरल्या जाणार्या 40 टक्के औषधे ही अशी आहेत की ती नैसर्गिक उत्पादनांमधून मिळतात.
जागतिक कडधान्य दिन: डाळी आहेत आरोग्यासाठी फायदेशीर.. आहारात समावेश केल्याने मिळतील ‘हे’ फायदे