Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एका दिवसात सापडलेत फक्त ‘इतके’ कोरोना रुग्ण.. पहा, आता काय आहे देशातील परिस्थिती..?

मुंबई : देशात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1660 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 30 लाख 18 हजार 032 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2,349 रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानंतर, या साथीच्या आजारातून बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या चार कोटी 24 लाख 80 हजार 436 झाली आहे. याच कालावधीत अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 4,789 ने कमी होऊन 16,741 वर आली आहे. विशेष म्हणजे, देशातील कोरोना मृत्यू दर 1.21 टक्के, बरे होण्याचा दर 98.75 टक्के आणि संसर्ग दर 0.04 टक्के आहे.

Advertisement

केरळमध्ये, गेल्या 24 तासांत 410 ची घट झाल्यानंतर अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 5,219 वर आली आहे. त्याच वेळी, 872 लोक बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 64,57,300 वर गेली आहे, तर मृत्यूंची संख्या 67,631 वर गेली आहे. महाराष्ट्रात या कालावधीत अॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये 4,078 ची कमाल घट झाल्यानंतर, ती आता 892 राहिली आहे. या कालावधीत राज्यातील 346 लोक बरे झाल्यानंतर या साथीच्या आजारावर मात करणाऱ्यांची संख्या 77,24,560 झाली आहे. राज्यातील मृत्यूंची संख्या 1,43,779 वर पोहोचली आहे.

Advertisement

याआधी 7 ऑगस्ट 2020 रोजी देशात रुग्णांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा टप्पा पार केला होता. गेल्या वर्षी, 4 मे रोजी संक्रमितांची संख्या 2 कोटी पार केली होती आणि 23 जून 2021 रोजी ती 3 कोटी पार केली.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात कोरोना आटोक्यात येत असला तरी चीन, दक्षिण कोरिया, फ्रान्स, इटली, ब्रिटेन या काही देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रोज लाखोंच्या संख्येत नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क आहे. या देशांतील कोरोना परिस्थितीचा विचार करुन त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहेत. तसेच देशातील राज्यांनाही आवश्यक आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

बाब्बो.. आता कोरोनाने चीनला केलेय हैराण.. फक्त 25 दिवसांत सापडलेत ‘इतके’ रुग्ण; जाणून घ्या, Corona Update..

Advertisement

जर्मनी 3 लाख, फ्रान्स 1.5 लाख.. जगात पुन्हा कोरोनाची दहशत; जाणून घ्या, जागतिक कोरोना अपडेट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply