Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘टीबी’ विरोधात केलाय जोरदार संघर्ष..! देशात ‘या’ लहान राज्याने मारली बाजी.. पहा, काय केलीय कामगिरी..?

दिल्ली : देशातील मोठ्या राज्यांना मागे टाकत हिमाचल प्रदेशने (Himachal Pradesh) क्षयरोग (टीबी) निर्मूलनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांचे मूल्यांकन केल्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हिमाचल आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याचा सत्कार करणार आहेत. हिमाचलने गेल्या वर्षभरात टीबी (TB) निर्मूलनात चांगले काम केले आहे. आरोग्य विभागाकडून गावोगाव पथके पाठवण्यात आली. या दरम्यान टीबीचे रुग्ण आढळून आले.

Advertisement

या रुग्णांची संख्या 14,495 असल्याचे आढळून आले. आरोग्य विभागातर्फे त्यांना घरपोहोच मोफत औषधे देण्यात आली. आरोग्य कर्मचारी ही औषधे त्यांच्यासमोर रुग्णांना देत आहेत. या प्रशंसनीय कार्यासाठी हिमाचल प्रदेशने मोठ्या राज्यांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांच्या श्रेणीमध्ये सिक्कीम प्रथम, गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत, दादरा नगर हवेली आणि दमण दीव प्रथम आणि अंदमान आणि निकोबार बेटे दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशमध्ये राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारने राज्य आणि जिल्हा स्तरावर टीबी निर्मूलनासाठी उपराष्ट्रीय कार्यक्रम सुरू केले आहेत. 2021-22 या वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे नामांकन करण्यात आले होते. राज्यातील आठ जिल्हे हमीरपूर, किन्नौर, कुल्लू, कांगडा, मंडी, शिमला, लाहौल यांना रौप्य पदक तर सिरमौर आणि सोलन जिल्हा यांना कांस्य पदक देण्यात येणार आहे.

Advertisement

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत दिलीय महत्वाची माहिती.. जाणून घ्या, तुमच्यासाठीही आहे महत्वाचे..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply