Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मागील 24 तासात देशात सापडलेत ‘इतके’ कोरोनाचे रुग्ण; जाणून घ्या, Corona Update..

दिल्ली : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,778 नवीन रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत. 2,542 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आणि 62 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 4,30,12,749 रुग्ण आढळले आहेत. सध्या देशभरात 23,087 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. आतापर्यंत एकूण 4,24,73,057 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. त्याच वेळी 62 मृत्यूंनंतर देशातील एकूण मृत्यू 5,16,605 वर पोहोचले आहेत. आतापर्यंत एकूण 1,81,89,15,234 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.

Advertisement

त्याच वेळी काल कोरोनाचे 1,581 नवीन रुग्ण आढळले होते. यासह, एकूण प्रकरणांची संख्या 4,30,10,971 वर गेली आहे. तर देशात अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 23,913 वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते, की कोविड-19 मध्ये आणखी 33 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर, या साथीच्या आजाराने मृत्यूंची संख्या 5,16,543 वर पोहोचली होती.

Advertisement

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 104 नवीन प्रकरणे समोर आली असून या साथीमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, संसर्गाचे प्रमाण 0.37 टक्के आहे. दिल्लीत आतापर्यंत 18,64,003 संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोविड-19 मुळे आणखी एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत्यूंची संख्या 26,148 वर पोहोचली आहे. मंगळवारपर्यंत 355 रुग्ण होम-आयसोलेशनमध्ये होते. दिल्लीत सध्या 3101 कंटेन्मेंट विभाग आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत आणि या घातक विषाणूविरूद्ध वेगाने लसीकरण केले जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अग्रवाल यांनी म्हटले होते की, ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराचा धोका अद्याप संपलेला नाही. मात्र, कोरोनाचा प्रतिकार करण्यात अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशाने चांगली कामगिरी केली आहे. ते म्हणाले, की ‘भारताने जगभरातील 99 देशांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) दिली आहे. फक्त 145 दिवसांत 250 दशलक्ष डोस दिले आहेत. आता देशात 181 कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.

Advertisement

‘WHO’ ने श्रीमंत देशांना फटकारले..! ‘त्यामुळेच’ युरोपात वाढतोय कोरोना; पहा, कोरोनाने कसा घेतलाय फायदा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply