Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : जगात पुन्हा वाढतोय कोरोना; पहा, मागील 24 तासांत किती सापडले नवे रुग्ण..

दिल्ली : कोरोनामुळे चीन (China) आणि हाँगकाँगमधील (Hongkong) परिस्थिती बिघडल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये संसर्गाच्या ताज्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मागील 24 तासांत जगभरात 11 लाखांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण (Corona Patient) सापडले आहेत. त्याच वेळी, कोरोनामुळे 2,917 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, चीनच्या अनेक राज्यांमध्ये करोडो लोक लॉकडाऊनमध्ये (Lockdown) आहेत.

Advertisement

ज्या देशांमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने सुरू झाला आहे त्यात चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि जपान यांचा समावेश आहे. दक्षिण कोरियामध्ये गेल्या 24 तासांत 3.34 लाख रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन दिवसांत येथे 11 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे पुन्हा एकदा परिस्थिती अनियंत्रित झाल्याने चीनमध्ये अनेक ठिकाणी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Advertisement

भारतीय-अमेरिकन सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी इशारा दिला आहे, की कोविड-19 आजार अद्याप संपलेला नाही आणि येत्या काही महिन्यांत प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. मूर्ती यांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी निधी कमतरतेबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, साथीच्या रोगाचा फैलाव पाहता आपण पुन्हा तयार राहायला हवे. येत्या काही महिन्यांत संसर्गामध्ये वाढ आणि घट होऊ शकते, असे ते म्हणाले. परंतु लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागणार नाही, हे ध्येय असले पाहिजे.

Loading...
Advertisement

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान, हाँगकाँगने ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांवर टाकलेले उड्डाण निर्बंध मागे घेण्याची घोषणा केली आहे. प्रशासन शहरात येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाइनचा कालावधीही कमी करेल. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपिन्स, ब्रिटन आणि अमेरिका यांनाही 1 एप्रिलपासून या निर्बंधांतून दिलासा मिळणार आहे. येथे येणारे परदेशी आता 14 ऐवजी सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहू शकतात, परंतु त्या दरम्यान त्यांना व्हायरसचा निगेटिव्ह अहवाल (Corona Virus Report) सादर करावा लागेल.

Advertisement

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत दिलीय महत्वाची माहिती.. जाणून घ्या, तुमच्यासाठीही आहे महत्वाचे..

Advertisement
Advertisement

Leave a Reply