आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत दिलीय महत्वाची माहिती.. जाणून घ्या, तुमच्यासाठीही आहे महत्वाचे..
दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत आणि या घातक विषाणूविरूद्ध वेगाने लसीकरण केले जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अग्रवाल यांनी म्हटले आहे की, ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराचा धोका अद्याप संपलेला नाही. मात्र, कोरोनाचा प्रतिकार करण्यात अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशाने चांगली कामगिरी केली आहे. ते म्हणाले, की ‘भारताने जगभरातील 99 देशांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) दिली आहे. फक्त 145 दिवसांत 250 दशलक्ष डोस दिले आहेत. आता देशात 181 कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या साथीच्या आजाराने मृत्यूंची संख्या 5,16,510 वर पोहोचली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.06 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर (Recovery Rate) 98.74 टक्के आहे. संसर्गाचा दैनंदिन दर 0.40 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 0.40 टक्के होता. देशात आतापर्यंत एकूण 78.30 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोना आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,24,67,774 झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के आहे. देशातील संक्रमित लोकांची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांवर गेली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा टप्पा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती आणि 23 जून 2021 रोजी रुग्णसंख्या तीन कोटींच्या पुढे गेली होती.
Corona Update : कोरोना येतोय आटोक्यात..! 24 तासांत सापडलेत फक्त ‘इतके’ नवे रुग्ण; जाणून घ्या..