Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात वाढलाय उन्हाळा पण, कारण ठरतोय पाकिस्तान.. पहा, वाढत्या उन्हाळ्याचे काय आहे पाकिस्तान कनेक्शन..?

दिल्ली : मार्च महिना संपायला अजून 10 दिवस बाकी आहेत पण, दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याचा उन्हाळ्याने लोकांना हैराण केले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) कडक उन्हाची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. या उन्हाळ्याची दोन मोठी कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे राजस्थानात (Rajasthan) वाहणारे उलटे चक्री वारे आणि दुसरे कारण म्हणजे मध्य पाकिस्तानामधून (Pakistan) येणारे उष्ण वारे. या दोन्ही कारणांमुळे दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे. राजस्थानच्या काही भागातही उष्णतेची लाट (Heat Wave) सुरू झाली आहे.

Advertisement

दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत उष्णतेचा प्रभाव आणखी वाढणार आहे. मार्चच्या अखेरीस दिल्ली-एनसीआरमध्ये कमाल तापमान (Temperature) 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल. असे घडले तर मार्च महिन्यातच उष्णतेने 77 वर्षांचा विक्रम मोडीत काढला जाईल. यासह दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेचा नवा सर्वकालीन विक्रमही (Record) होऊ शकतो. मार्च महिन्यात आतापर्यंत सर्वकालीन विक्रम 31 मार्च 1945 चा आहे, कमाल तापमान 40.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते.

Advertisement

उन्हाळ्याची स्थिती अशी आहे की, मार्च महिन्यातच दिल्ली-एनसीआरमध्ये मे महिना जाणवू लागला आहे. दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दिवशी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्याच वेळी, दिल्लीचे किमान तापमान शनिवारीच 19.0 अंश सेल्सिअस नोंदले गेले आणि ते सामान्यपेक्षा 3 अंशांनी जास्त होते. पुढील काही दिवस कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Advertisement

स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणतात की, उष्णतेपासून अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही, हा त्रास सुरूच राहणार आहे. थार वाळवंट आणि मध्य पाकिस्तानमधून उष्ण वारे येऊ लागले आहेत. कोरडी हवा आणि निरभ्र आकाश यामुळे किमान आणि कमाल तापमानात विक्रमी वाढ झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दुसरीकडे, खासगी संस्थांच्या म्हणण्यानुसार मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान 40 अंशांच्या पुढे जाऊ शकते. असे घडल्यास मार्च महिन्यात कमाल तापमान 40 अंशांवर पोहोचेल तेव्हा 72 वर्षांचा विक्रम मोडेल.

Loading...
Advertisement

राजस्थानच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उष्ण वारे लवकरच दिल्ली-एनसीआरकडे सरकतील. मंगळवारी ताशी 20-30 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता सध्या नगण्य आहे. संपूर्ण महिनाभर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा महिनाही कोरडा राहील. उष्णता वाढतच राहणार आहे.

Advertisement

महेश पलावत यांनी सांगितले की, काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. राजस्थानमध्ये मार्चच्या उत्तरार्धात तयार होणार्‍या विरुद्ध चक्री वारे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तयार होतात ते यावेळी मात्र लवकर तयार झाले आहेत. कोणताही अडथळा नसल्याने थार वाळवंट आणि मध्य पाकिस्तानमधून गरम वारे येऊ लागले. कोरडी हवा आणि निरभ्र आकाश यामुळे किमान आणि कमाल तापमानातही विक्रमी वाढ झाली आहे. मात्र, मंगळवारी जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कमाल तापमान दोन अंशांनी 35 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होऊ शकते.

Advertisement

बाब्बो.. मार्चमध्येच जाणवतोय मे मधील उन्हाळा.. हवामान खात्याने देशातील ‘या’ शहरांना दिलाय अलर्ट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply