Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का..? ; आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेय ‘हे’ उत्तर; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

मुंबई: चीन, दक्षिण कोरियासह आशियातील मोठ्या भागात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग अत्यंत वेगाने वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत चीनमध्ये जितके कोरोनाचे रुग्ण समोर आले नव्हते, तितके आता दररोज समोर येत आहेत. या बातमीने पुन्हा एकदा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. भारतानेही तत्काळ खबरदारी आणि सतर्कतेशी संबंधित उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. या मुद्द्यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही भाष्य केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे का ? या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांना दिले.

Advertisement

राजेश टोपे म्हणाले, की ‘कोरोनाची चौथी लाट चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये आली आहे. दक्षिण कोरियातील रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात बेड मिळत नाहीत. अशा वेळी भविष्याची भीती आणि भूतकाळातील अनुभव लक्षात घेऊन सतर्क राहण्याची गरज आहे. केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार राज्य सरकार निर्णय घेईल. युरोप, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत हलगर्जीपणा करणे आपल्याला परवडणारे नाही. अशा आशयाची पत्रे केंद्र सरकारने राज्य सरकारांना पाठवली आहेत. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्य सरकार आवश्यक ते निर्णय घेईल.

Loading...
Advertisement

चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमधील कोरोनाची ही नवी लाट लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून कोरोना निर्बंधांशी संबंधित 5 सूत्रांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन कोरोना बाधितांची संख्या जास्त नाही, याचा विचार करून त्यांनी काळजी करू नये, असे राज्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, चाचणी, ट्रेसिंग, उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रोटोकॉल या 5 उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Advertisement

Corona Update : देशात 24 तासांत सापडलेत इतके कोरोना रुग्ण.. पहा, काय आहे परिस्थिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply