Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बिअर पिऊन किडनी स्टोनपासून मिळते का मुक्ती? चिल करण्यापूर्वी वाचा ही महत्वाची माहिती

नाशिक : किडनी स्टोन (मुतखडा) तयार होणे ही एक गंभीर आणि वेदनादायक समस्या आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे खडे केवळ मूत्रपिंडातच नसतात, तर पित्त आणि मूत्रमार्गात देखील तयार होऊ शकतात. किडनी स्टोन हे सोडियम किंवा कॅल्शियम सारख्या खनिजांचे कण असतात. जे किडनीमध्ये स्फटिक बनतात आणि जमा होतात. (On The Occasion Of World Kidney Day Know Does Drinking Beer Help Kidney Stones Pass Out Easily)

Advertisement

किडनी स्टोन तयार झाल्याने रुग्णाला (Kidney stone symptoms) तीव्र वेदना होतात. साहजिकच यामुळे लघवीला खूप त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत रुग्णांना ताप, मळमळ, लघवीमध्ये रक्त येणे, श्वासाची दुर्गंधी, पाठीच्या खालच्या भागात दुखणे आणि पांढरट रंगाची लघवी होण्याची शक्यता असते. काही लोकांचा असा विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बिअर पिल्याने किडनी स्टोन सहज बाहेर पडण्यास मदत होते. या प्रकरणात कितपत तथ्य आहे ते जाणून घेऊया. मूत्रपिंडाचे कार्य द्रव फिल्टर करणे आहे आणि ते अल्कोहोलसारखे हानिकारक पदार्थ देखील फिल्टर करतात. अल्कोहोलमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. हे असे रसायन आहे ज्यामुळे युरिक ऍसिड आणि किडनी स्टोन होतात. जेव्हा तुम्ही खूप मद्यपान करता तेव्हा तुमच्या मूत्रपिंडावर परिणाम होतो आणि ते प्युरिन काढू शकत नाहीत. हे नंतर किडनीमध्ये जमा होते, ज्यामुळे किडनी स्टोन तयार होतात.

Loading...
Advertisement

जेव्हा तुम्हाला मुतखडा असतो तेव्हा द्रव पदार्थ पिणे महत्वाचे आहे. जेणेकरून खडे लघवीतून निघून जाणे सोपे होईल. बिअरमुळे वारंवार लघवी होते हा एक समज आहे. यामुळेच असे मानले जाते की बिअर प्यायल्याने लघवीद्वारे दगड लवकर निघून जातात. 190000 मध्यमवयीन प्रौढांवर आठ वर्षांचा अभ्यास करण्यात आला आहे. ज्यांना यापूर्वी कधीही मुतखडा झाला नव्हता असे लोक यात होते. त्यात असे आढळून आले की जे लोक दररोज बिअर पितात त्यांच्यामध्ये किडनी स्टोन होण्याचा धोका 41% ने कमी झाला होता, त्यामुळे बिअरमुळे किडनी स्टोन दूर होऊ शकतात या गृहितकाला चालना मिळते. अर्थात बिअर पिण्याने किडनी स्टोन लघवीतून जाण्यास मदत होते असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसाधारणपणे, अल्कोहोलयुक्त पेये सेवन करणे मूर्खपणाचे आहे कारण अल्कोहोलमध्ये आढळणारे प्युरिन हे किडनी स्टोन तयार होण्यास जोखीम घटक आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply