Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दीर्घायुषी होण्यासाठी करा ‘या’ 3 सोप्या गोष्टी; पहा कसा होईल जीवनात फायदा

पुणे : जगण्याची आस हीच आपल्या जीवनाच्या प्रगतीची निशाणी आहे. त्यामुळेच आपले वय कसे वाढवायचे आणि आपले आरोग्य कसे निरोगी ठेवायचे, हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात. या प्रश्नांची उत्तरे अमेरिकेतील डॉ. मायकल ग्रेगर यांनी नुकतीच दिली आहेत. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) यांच्या संशोधनाचा हवाला देत डॉ. ग्रेगर म्हणाले की, निरोगी आणि दीर्घ आयुष्य हे तीन सवयींवर अवलंबून असते. (American Scientists Claim These 3 Habits Decide The Length Of Your Life)

Advertisement

पौष्टिकतेने समृद्ध आहार घेणे, धूम्रपान न करणे आणि दररोज 21 मिनिटे व्यायाम करणे या 3 सवयी कोणालाही दीर्घायुषी बनवू शकतात. सीडीसीच्या 6 वर्षांच्या दीर्घ संशोधनानुसार असे स्पष्ट झालेले आहे की, जे लोक या जीवनशैलीचे अनुसरण करतात त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता 82 % कमी होते. त्यासाठी जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आजच जास्तीचे तेल, मसाले आणि जंक फूड सोडा. आपल्या आहारात अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करा. माणसे वृद्ध होतात आणि आजारांना बळी पडतात कारण त्यांच्या शरीरात ऑक्सिडायझेशन सुरू होते. परंतु अँटिऑक्सिडंट्सने युक्त आहार घेतल्यास ही प्रक्रिया मंदावता येते. तुमच्या आहारात मांसाचा कमीत कमी समावेश करावा, असे डॉ.ग्रेगर सांगतात. कारण फळे आणि भाज्यांमध्ये मांसापेक्षा 64 पट जास्त अँटिऑक्सिडंट असतात.

Loading...
Advertisement

शिकागो मेडिसिन युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, धूम्रपानाचा आपल्या वृद्धत्वाशी विशेष संबंध आहे. धूम्रपानामुळे स्त्री आणि पुरुष दोघांच्या डीएनएचे नुकसान होते, ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. तुम्ही चांगला आहार घेतला तरी धूम्रपानाचे व्यसन तुमचे आयुष्य कमी करते. साथीच्या आजारात लॉकडाऊन आणि घरातून काम यामुळे आमची हालचाल पूर्णपणे थांबली आहे. डॉ.ग्रेगर यांच्या मते, बसणे हा देखील एक प्रकारचा धूम्रपान आहे. दररोज किमान 21 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये तुम्ही जॉगिंग-रनिंगपासून आवडीचे खेळही खेळू शकता. ऑनलाइन काम आणि अभ्यासातून थोडा ब्रेक घेणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. तुमच्या पाळीव प्राण्यांनाही लांबच्या अंतरावर फिरायला घेऊन जा. निसर्गासोबत वेळ घालवा. कारण व्यायाम महत्वाचा आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply