Corona Update : देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले.. पहा, 24 तासात किती नवे रुग्ण सापडले..?
मुंबई : देशात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. एका आठवड्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 4,575 नवीन रुग्ण आढळले आहेत. याआधी मंगळवारी देशात कोरोनाचे 3993 रुग्ण आढळले होते. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढली आहे. आज 145 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी कोरोनाच्या 108 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील एकूण मृत्यूंची संख्या आता 5,15,355 वर पोहोचली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण 50 हजारांपेक्षा कमी आहेत. सध्या देशात कोरोनाचे 46,962 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 4,24,13,566 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. देशात कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असला तरी जगात असे अनेक देश आहेत, जेथे परिस्थिती अजूनही धोकादायक आहे. आजही काही देशात हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण सापडत आहेत. आफ्रिकेतील देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी झाला असे म्हणता येणार नाही.
सन 2021 मध्ये जगाला लस पुरवठ्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागला असला तरी हे आव्हान आणखी मोठे असणार आहे. कारण असे अनेक देश आहेत जे मोठ्या प्रमाणावर लसीकरण कार्यक्रम राबवू शकत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी याआधी म्हटले होते की, काही लोक कोरोना संकट संपल्याचे वारंवार जाहीर करत आहेत. मात्र हे योग्य नाही.
सध्या हा साथीचा आजार संपेल असे कोणीही म्हणू शकत नाही. ते कधी संपेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे कोरोनाची साथ संपली या शब्दांवर विसंबून राहून सर्व खबरदारी सोडणे मूर्खपणाचे ठरेल. कोरोनाचा एक नवीन प्रकार कुठेही, कधीही उद्भवू शकतो आणि आपण जिथून सुरुवात केली होती तिथे पुन्हा येऊ शकतो. म्हणूनच अजूनही अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे.
Corona Update : कोरोनाचा विळखा होतोय कमी; 24 तासांत सापडलेत फक्त ‘इतके’ नवे रुग्ण..