कोरोनाबाबत केंद्र सरकारने दिलीय महत्वाची माहिती; जाणून घ्या, नेमके काय म्हटलेय आरोग्य विभागाने..?
दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, आताही अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. काही देशांमध्ये संसर्गाचा वेगही वाढत आहे. आजही जगात दररोज सुमारे 15 लाख प्रकरणे नोंदवली जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव अग्रवाल यांनी सांगितले की, जगातील अनेक देशांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. मात्र, देशात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये वेगाने घट होत आहे, ही दिलासादायक बाब आहे.
जगात कोरोना संसर्गामुळे दररोज 7 हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद होत आहे, तर 2 ते 8 फेब्रुवारी दरम्यान देशात 615 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याच वेळी, गेल्या आठवड्यात दररोज 144 मृत्यूची नोंद झाली. देशात, जानेवारी महिन्यात दररोज तीन लाखांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली, तर आठवड्यात सरासरी 96.4 टक्क्यांनी घटून 11,000 प्रकरणे नोंदली जात आहेत. सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 77,152 वर आली आहे.
इतकेच नाही तर देशात गेल्या 24 तासांत 6561 प्रकरणे नोंदवण्यात आली. फक्त एका राज्यात 10 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. दोन राज्यांमध्ये 5 हजार ते 10 हजारांच्या दरम्यान अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. उर्वरित राज्यांमध्ये 5 हजारांहून कमी अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. केरळ, महाराष्ट्र, मिझोराममध्ये देशात 50 टक्के अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या 4,29,45,160 झाली आहे, तर अॅक्टिव्ह प्रकरणे 77,152 वर आली आहेत. त्याच वेळी, संसर्गापासून बरे होण्याचा दर 98.62 टक्के झाला आहे. आतापर्यंत, देशात कोविड-19 विरोधी लसीचे 178.02 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशात गेल्या 24 तासांत संसर्गामुळे 142 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात आतापर्यंत 5,14,388 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता मात्र देशात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे.
Corona Update : देशात कोरोनाचे रुग्ण पु्न्हा वाढले.. पहा, 24 तासात किती नवे रुग्ण सापडले..?