Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचे थैमान सुरुच..! ‘या’ देशात कोरोना होतोय आऊट ऑफ कंट्रोल; सरकारची लॉकडाऊनची तयारी..?

दिल्ली : जगात काही देशात अजूनही कोरोनाचे थैमान सुरुच आहे. सोमवारी हाँगकाँगमध्ये सर्वाधिक 34,466 कोरोना रुग्णांची नोंद झाली. शहरात आधीच कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, की हाँगकाँगमध्ये लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, लॉकडाऊन होणार नाही, असे येथील एका नेत्याने मागील आठवड्यातच सांगितले होते. मात्र, येथे परिस्थिती दिवसेंदिवस आधिकच खराब होत आहे.

Advertisement

हाँगकाँग सध्या कोरोना व्हायरसच्या पाचव्या लाटेचा सामना करत आहे. या देशात ओमिक्रॉनचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत आहेत. सोमवारची 34,000 हून अधिक प्रकरणे आठवड्याआधीच्या तुलनेत चौपट आहेत. एका आठवड्यापूर्वी शहरात 7,500 हून अधिक संक्रमणाची नोंद झाली होती. रुग्णांची संख्या दर तीन दिवसांनी दुप्पट होईल. शहराच्या आरोग्य संरक्षण केंद्राचे मुख्य वैद्यकीर अधिकाऱ्यांनी सांगितले, की येत्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढत जाणार आहे. सोमवारीही शहरात 87 जणांचा मृत्यू झाला. 87 मृत्यूंपैकी 67 जणांना लसीकरण करण्यात आले नव्हते.

Advertisement

आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले, की सरकारकडून उपाययोजना केल्या जाऊ शकतात ज्यात “लोकांना घरी राहण्यास सांगितले जाऊ शकते” मात्र, कायद्याद्वारे किंवा अन्य मार्गाने अशा उपाययोजना केल्या जातील का, हे पाहणे बाकी आहे. हाँगकाँगच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, लोकांची हालचाल कमी करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासण्या करण्यासाठी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर सरकार “अजूनही चर्चा” करत आहे.

Loading...
Advertisement

हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात मार्चसाठी शहरव्यापी सार्वत्रिक चाचणी जाहीर केली. शहरातील 7 दशलक्षाहून अधिक रहिवाशांच्या तीन वेळा चाचण्या झाल्या. तर दुसरीकडे सरकारने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी काही प्रतिबंध जाहीर केले आहेत. अद्याप लॉकडाऊन जाहीर केलेले नाही. मात्र, रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर कदाचित लॉकडाऊन होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

कोरोनाचे थैमान..! दवाखाने भरले.. रस्त्यावरच सुरू आहेत रुग्णांवर उपचार; पहा, कुठे आलेत कोरोनाचे जुने दिवस

Advertisement
Advertisement

Leave a Reply