Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

माथेफिरू तालिबानींचा अजब कारनामा; 8 पोलिओ आरोग्य सेवकांची केली हत्या

Please wait..

लंडन : संयुक्त राष्ट्र संघाने गुरुवारी उत्तर अफगाणिस्तानात आठ पोलिओ लसीकरण कर्मचार्‍यांच्या हत्येचा निषेध केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला आहे.

Advertisement
Loading...

यूएन सरचिटणीसचे मुख्य प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले: “चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हत्यांच्या क्रूरतेमुळे आम्हाला धक्का बसला आहे. अफगाणिस्तानातील सरचिटणीसचे उप विशेष प्रतिनिधी रमीझ अल्काबरोव यांनीही या हत्येचा निषेध केला. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनीही या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लक्ष्य करू नये, असे ते म्हणाले. दरम्यान, कुंदुझ आणि तखार प्रांतातील राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम तात्काळ स्थगित करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply