Corona Update : कोरोनाबाबत महत्वाची माहिती.. 24 तासांत पुन्हा वाढलेत कोरोनाचे रुग्ण.. जाणून घ्या, अपडेट..
मुंबई : देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. असे असले तरी मागील 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत थोडी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत अपडेट जारी केले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 15,102 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अहवालानुसार, या कालावधीत 31,377 लोक बरे झाले आहेत, तर 278 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल, बुधवारी देशात कोरोनाचे एकूण 13,405 रुग्ण आढळले होते.
कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आता 1,64,522 पर्यंत कमी झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4,21,89,887 लोक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 4,28,67,031 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 5,12,622 लोकांचा या घातक आजारामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी जगभरात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. अनेक देशात या घातक आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे या देशांतील परिस्थिती दिवसेंदिवस आधिकच खराब होत आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचे नवीन प्रकार, ओमिक्रॉन आल्यानंतर, जगभरात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
आतापर्यंत जगभरात 42.13 कोटींहून अधिक लोक कोविड-19 च्या विळख्यात आले आहेत. तर कोट्यावधी लोक बरे सुद्धा झाले आहेत. त्याच वेळी, या आजारामुळे आतापर्यंत 58.7 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासा देणारी बातमी अशी आहे की, आतापर्यंत जगभरात 10.31 अब्ज लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले गेले आहे. असे असले तरी जगात अनेक देशांत कोरोनाचे थैमान सुरुच आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला आहे.
.. म्हणून बिल गेट्स यांनी केलेय भारताचे कौतुक; पहा, कोरोना लसींबाबत नेमके काय म्हटलेय त्यांनी..?