Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : कोरोनाबाबत मिळालाय महत्वाचा अपडेट.. पहा, मागील 24 तासांत किती सापडलेत नवे रुग्ण..?

मुंबई : देशभरात कोरोनाचा संसर्ग आता कमी होत आहे आणि त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. आता बर्‍याच राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अत्यंत कमी संख्येने राहिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 16,051 नवीन रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज 3,917 कमी रुग्ण सापडले आहेत. तथापि, आज पॉजिटिविटी दरात थोडी वाढ झाली आहे. पॉजिटिविटी दर आता 1.93 टक्क्यांवर आला आहे. काल पॉजिटिविटी दर 1.68 टक्के नोंदला गेला.

Advertisement

अनेक दिवसांच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार, मृत्यूंच्या संख्येत तितकीशी घट झाली नव्हती. परंतु कालच्या तुलनेत आज कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 206 जणांचा या घातक आजारामुळे मृत्यू झाला आहे. काल 673 लोकांचा मृत्यू झाला होता. देशातील एकूण मृत्यूंची संख्या आता 5,12,109 वर पोहोचली आहे. कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील 24 तासांत 37,901 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आता देशात एकूण 4,21,24,284 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.

Advertisement

कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाही सरकारने चाचण्या कमी केलेल्या नाही. त्यामुळे सरकारला कोरोना ट्रेसिंगमध्ये यश मिळत आहे. माहितीनुसार, काल देशभरात एकूण 8,31,087 नमुने तपासण्यात आले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, कालपर्यंत एकूण 76,01,46,333 नमुने तपासण्यात आले आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी जगभरात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. अनेक देशात या घातक आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे या देशांतील परिस्थिती दिवसेंदिवस आधिकच खराब होत आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचे नवीन प्रकार, ओमिक्रॉन आल्यानंतर, जगभरात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

आतापर्यंत जगभरात 42.13 कोटींहून अधिक लोक कोविड-19 च्या विळख्यात आले आहेत. तर कोट्यावधी लोक बरे सुद्धा झाले आहेत. त्याच वेळी, या आजारामुळे आतापर्यंत 58.7 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासा देणारी बातमी अशी आहे की, आतापर्यंत जगभरात 10.31 अब्ज लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले गेले आहे.

Advertisement

Corona Update : जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ.. पहा, कोरोनाबाबत काय आहे अपडेट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply