कोरोनाचे टेन्शन होतेय कमी..! देशात मागील 24 तासात सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण; जाणून घ्या, महत्वाची माहिती..
मुंबई : देशभरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत आहे. नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. मागील 24 तासात देशभरात कोरोनाचे 19 हजार 968 नवीन रुग्ण आढळले तर 673 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 48,847 लोक बरे झाले आहेत, ज्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या 4,20,86,383 झाली आहे. देशात सध्या कोरोनाचे 2,24,187 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, ज्याचा दर 0.52% आहे. कोविड संसर्गामुळे आतापर्यंत 5,11,903 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दैनिक पॉजिटिविटी दर 1.68% आहे. साप्ताहिक पॉजिटिविटी दर 2.27% आहे आणि रिकव्हरी दर 98.28% आहे. शनिवारी देशभरात 11,87,766 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत 75.93 कोटी चाचण्या झाल्या आहेत. त्याच वेळी, कोविड-19 विरुद्ध लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत देशभरात 175.37 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या 1,635 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 78,55,359 वर पोहोचली आहे. यासह, एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 1,43,576 वर पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत राज्यभरात 4,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, या आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 76,91,064 झाली आहे. राज्याचा रिकव्हरी दर 97.89 टक्के आणि मृत्यूदर 1.82 टक्के आहे.
मध्य प्रदेशात शनिवारी कोरोनाचे 1,013 नवीन रुग्ण आढळून आल्याने राज्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 10,33,490 झाली आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूंची संख्या 10,713 वर पोहोचली आहे. ते म्हणाले की, शनिवारी इंदौरमध्ये 74 आणि भोपाळमध्ये 261 कोरोना व्हायरस संसर्गाची नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.