Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक बातमी..! मागील 24 तासांत आढळलेत ‘इतके’ नवे रुग्ण; पहा, काय आहे परिस्थिती

मुंबई : देशात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 25,920 नवीन प्रकरणे आढळून आली, जी बुधवारपेक्षा 4,837 कमी आहे. या दरम्यान 492 रुग्णांचा मृत्यू झाला असून 66,254 लोक बरे झाले आहेत. सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे 2,92,092 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनिक पॉजिटिविटी दर 2.07% आहे. साप्ताहिक पॉजिटिविटी दर 2.76% आहे.

Advertisement

सध्या रिकव्हरी रेट 98.12% आहे. देशभरात आतापर्यंत 4,19,77,238 लोक बरे झाले आहेत. गुरुवारी देशभरात 12,54,893 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत 75.68 कोटींहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. कोरोना विरुद्ध लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत देशभरात 174.64 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Advertisement

गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 2,797 नवीन रुग्ण आढळले, त्यानंतर राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 78,53,291 वर पोहोचली. गेल्या 24 तासात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यानंतर एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 1,43,532 वर पोहोचली आहे. राज्यात ओमिक्रॉनचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही, नवीन विषाणूची संख्या 4,456 वर राहिली आहे. या दरम्यान 6,383 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एकूण बरे झालेल्यांची संख्या 76,81,961 झाली आहे.

Loading...
Advertisement

मध्य प्रदेशात गुरुवारी कोरोनाचे 1,328 नवीन रुग्ण आढळून आल्याने संक्रमित लोकांची संख्या 10,31,589 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात गेल्या 24 तासांत या आजाराने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात आतापर्यंत एकूण 10,709 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 11,535 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 2,780 लोक बरे झाल्याने राज्यात आतापर्यंत 10,09,345 जणांनी या आजारावर मात केली आहे.

Advertisement

कोरोनाबाबत मिळालीय महत्वाची माहिती; जाणून घ्या, आज देशात किती नवे रुग्णांची पडलीय भर ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply